मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, ‘हा’ मोठा नेता सोडणार पक्ष

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news today) यांच्या शिवसेनेत लढत आहे. यामध्ये आता एक नवीन राजकीय वळण आले आहे. त्यामुळे नाशिकची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत.

उध्दव ठाकरेंनी माजी आमदार(political news today) राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर वाजे यांनी आपल्या प्रचार देखील सुरू केला. संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. मात्र करंजकर या प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत.

करंजकर यांनी यापूर्वीच स्वतःसाठी आणि पत्नी भगूरच्या माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्यासाठी लोकसभा उमेदवारी अर्ज नेले आहेत. ते आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. या उमेदवारीमुळे नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

करंजकर यांची उमेदवारी खरोखर निवडणुकीसाठी आहे की, माघार घेऊन अन्य राजकीय डावपेचाचा भाग म्हणून आहे याची उत्सुकता आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, विजय करंजकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. येत्या 6 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज मागे घेतील.

सध्या करंजकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या वाटाघाटी सुरू आहेत. करंजकर येत्या 7 एप्रिलला शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटाचा मोठा नेता नाशिकमध्ये येईल. करंजकर यांच्या प्रवेशामुळे हेमंत गोडसे यांना निवडणूक अधिक सोपी होईल असे चित्र आहे.

करंजकर यांच्यासोबत असलेले देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप आणि अन्य काही पदाधिकारी या प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता आहे. करंजकर यांचा संबंध प्रामुख्याने देवळाली मतदारसंघाशी येतो. त्यामुळे प्रारंभी घोलप हे करंजकर यांच्यासोबत होते. मात्र, आता त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला आहे.

आपण ठाकरे गटासोबतच राहणार असून अन्य कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत जोरदार राजकीय घडामोडी होण्याच्या होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

काँग्रेसला अजून एक धक्का, माजी मुख्यमंत्री भाजपात जाणार? या नेत्याचा दावा

विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल : संजय राऊत 

सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला