विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारसंघ निहाय (background)आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. संभाव्य प्रबळ उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. महायुती – महाविकास आघाडी या दोन्हीकडून वरकरणी संयुक्तपणे लढण्याची भाषा केली जात असली तरी पक्षांतर्गत छुप्या पद्धतीने स्वबळावर लढण्याची अंतर्गत रणनीती आखली जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने जाहीर हालचाली कमी झाल्या असल्या तरी पक्षीय कार्यालयाच्या पातळीवर अंतर्गत हालचालींना गती आली आहे. राज्यातील सत्तारूढ महायुती आणि विरोधी मविआ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्तपणे सामोरे जाणार असल्याचे विधान केले आहे. इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या अनुषंगाने वादग्रस्त टीकाटिपणी करणाऱ्या प्रवक्त्या, दुसरया फळीतील नेत्यांना अशी विधाने न करण्याबद्दल तंबी देण्यात आली आहे.
निवडणुकीला सामूहिक ताकती द्वारे सामोरे जाऊन पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. तर महायुतीला रोखून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मविआ (background)कटिबद्ध झाली आहे. याचवेळी महायुती आणि मविआसह अन्य पक्षांकडूनही विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत मतदार संघ निहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी पक्षामध्ये हे चित्र दिसत असले तरी अशीच परिस्थिती अन्य जिल्ह्यांमध्ये असल्याचेही सांगण्यात येते.कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेच्या निरीक्षकांनी मतदारसंघ निहाय आढाव्याचे काम याआधीच पूर्ण केले आहे. याची यादी मातोश्रीवर गेलेली आहे. संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत रविवारी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर मेळाव्यात रणनीती आखली जाणार आहे, असे उपनेते संजय पवार यांनी सांगितले. शिंदे सेनेचे मुंबईतील निरीक्षक शरद कणसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होऊन सर्व १० मतदार संघात इच्छुकांची यादी निश्चित करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा या पारंपरिक मतदारसंघातील लढण्याची तयारी सुरु आहे. इचलकरंजीमध्ये जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच (background)मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली असून ती घेऊन जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व सहकारी हे शरद पवार यांना भेटीसाठी जाणार होते. पावसामुळे त्यांना थांबण्यासाठी सांगितले असून पुढील आठवड्यामध्ये आढावा बैठक होणार आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील टिळक भवन कार्यालयामध्ये एका बैठकीच्या आयोजन केले होते. विधान परिषद निवडणुकीमुळे ही बैठक स्थगित केली असून त्यानंतर जिल्हा मतदारसंघ निहाय आढावा घेण्याचे काम सुरू होईल, असे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी, प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी नमूद केले.
हेही वाचा :
नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम
शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका
सांगली जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी 260 अतिरिक्त बस सेवा!
कोल्हापुर दोन तरण्याबांड मुलांच्या अकाली मृत्यूनंतर आईनं पाचव्या दिवशी अखेरचं श्वास