कोल्हापुरात सामायिक शेतीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने केला काकाचा गेम

कोल्हापूर प्रतिनिधी : एलसीबीच्या पथकाने केली दोघांना अटक(uncle). सामायिक शेतीच्या वादातून वृद्ध काकाचे अपहरण करून अल्पवयीन पुतण्याने साथीदाराच्या मदतीने खून करून मृतदेह नदीच्या बंधाऱ्यात फेकला. चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावात २६ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. यामध्ये वसंत पांडुरंग पाटील( वय 65 ) यांचा खून झाला होता. स्थानिक गुन्हने अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास करून अल्पवयीन पुतण्यासह त्याचा साथीदार गणेश परशुराम जिंगरुचे (वय 26 रां.सोनोली तालुका बेळगाव , कर्नाटक ) दोघांना बुधवारी सायंकाळी जेरबंद केले आहे.

मयत वसंत पाटील व त्यांचा पुतण्या(uncle) यांच्यात हाळ नावाच्या सामायिक शेतावरून वाद होता. या वादातून त्यांच्यात अनेक वेळा भांडणही झाले होती. 26 मार्च रोजी ते शेतात वरण आणण्यासाठी गेले होते तेव्हापासून बेपत्ता झाले. मुलाने याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलीस शोध घेत होते.

दरम्यान वसंत पाटील ज्या शेतात वैरण काढत होते. तेथे रक्ताचे डाग दिसले होते यावरून त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. पाटील यांचा खून झाला असावा हे गृहीत धरूनच पोलीस तपास करत होते. ज्या दिवशी वसंत पाटील बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांचा पुतण्या शेतात वैरण काढण्यासाठी गेला होता. अशी माहिती पोलिसांना समजले होते त्यानुसार पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने आपण काकाचा गेम केल्याची कबुली दिली.

काका वसंत पाटील यांच्या डोक्यात काठीने मारून तसेच विळ्याने वार करून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह मित्राच्या मदतीने कारच्या डिकीत मध्ये ठेवला आणि तुर्केवाडी गावच्या दरम्यान असलेल्या नदीच्या बंधाऱ्यावरून मृतदेह पाण्यात फेकला अशी कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच त्यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन या खून प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

कालचा गोंधळ बरा होता! सामान्य माणसाची प्रतिक्रिया

काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा

नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल