रिकर्वमध्ये हिंदुस्थानी संघ अंतिम फेरीत

हिंदुस्थानच्या पुरुष रिकर्व संघाने विजयाच्या (success)हॅट्ट्रिकसह तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. धीरज बोम्मदेवरा, तरुणदीप राय व प्रवीण जाधव या हिंदुस्थानी त्रिकुटाने ही कमाल केली.

हिंदुस्थानी संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत सुरुवातीच्या पिछाडीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना 5-3 अशी बाजी मारली. या विजयानंतर हिंदुस्थानी त्रिकुटाने मागे वळून पाहिले नाही.(success) उपांत्यपूर्व फेरीत स्पेन आणि उपांत्य फेरीत इटलीचा 5-1 अशा सारख्याच फरकाने धुव्वा उडवित विजेतेपदाची लढत निश्चित केली. आता रविवारी जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानपुढे दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. हिंदुस्थानी महिला संघाला अंतिम 16 मध्ये मेक्सिकोने 5-3 गुण फरकाने हरविले. अंकिता भगत, दीपिका कुमारी व भजन काwर या त्रिकुटाला पुरुष संघाच्या पावलावर पाऊल टाकून आगेकूच करण्यात अपयश आले.

कपाऊंड वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत गुरुवारी हिंदुस्थानला संमिश्र यश मिळाले. आदिती स्वामी व अभिषेक शर्मा हे लवकरच स्पर्धेतून बाद झाले. मात्र ज्योती सुरेखा वेन्नम व प्रियांश यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या कपाऊंड प्रकारातील उपउपांत्य फेरीत प्रियांशने शूटआऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत अव्वल मानांकित नेदरलॅण्डस्च्या माइक स्क्लोसरचा 149-149 (10-9) असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. आता उद्या (दि.26) उपांत्य फेरीत प्रियांशची गाठ अमेरिकेच्या निक कापर्स याच्याशी पडणार आहे.

हेही वाचा :

उम्मीद पर ‘आरसीबी’ कायम है! सहा पराभवानंतर चाखली विजयाची चव

सावध राहा! नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा संजय मंडलिक यांना इशारा

महाराष्ट्रात उद्या किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?