भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरला आहे.

20 विश्वचषकात आता सुपर 8 चा थरार सुरु झाला आहे. भारतीय संघ आज बांगलादेश विरोधात मैदानात (field) उतरला आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स  स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो यानं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. शांतो यानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतऱणार आहे. भारतीय संघाने आज  बाजी मारली तर उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित होणार आहे. रोहित शर्मा अॅण्ड कंपनी आज जेतेपद मिळण्यासाठी मैदानात उतऱणार आहे. विराट कोहलीकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल कऱण्यात आला नाही (field). मागील सामन्यातील विजयी संघ उतरण्यात आला आहे. तर बांगलादेशच्या संघात एक बदल कऱण्यात आलाय. टस्कीन अहमद याला प्लेईंग 11 मधून आराम देण्यात आला.  जाकेर अली टीम  याला बांगलादेशच्या ताफ्यात स्थान देण्यात आलेय. .  पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11

टीम इंडियाची प्लेईंग 11   – 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

बांगलादेशची प्लेईंग 11 – 

तंजीद हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली टीम , रिशाद हुसेन, महेदी हसन, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान. 

भारताला एकवेळा पराभवाचा धक्का दिलाय (हेड टू हेड)

 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा एकदा पराभव केला आहे. दुसरीकडे भारतीय संघाने 11 वेळा बांगलादेशचा धुव्वा उडवलाय.  

T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात भारताने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता (field). या सामन्यात कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली. आता कुलदीप बांगलादेशविरुद्धही एक्स फॅक्टर ठरू शकतो. त्यांच्यासोबतच सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांची कामगिरीही संघासाठी महत्त्वाची ठरू शकते.

हेही वाचा :

लेट येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाचे थेट पगार कापणार सरकारचा निर्णय..

पंकजा मुंडेंना OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप

सांगलीतील पराभवावरुन भाजपचे चिंतन; कार्यकर्त्यांनी आवळला नाराजीचा सूर