जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणपूरक वस्तूंचा घेऊ ध्यास

जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा (celebrate)केला जातो.


जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा (celebrate)केला जातो. या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली होती. पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिनामागचा उ्द्देश आहे. एकूण १९३ देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

आपण पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती जगभरात निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे हवामान बदल होय, जो आपण सर्वजण अनुभवत आहोत. दरवर्षी या दिवशी पर्यावरण रक्षणासाठी एक थीम ठरवली जाते आणि यावर्षीची थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक म्हणजेच पृथ्वी विरुद्ध प्लॅस्टिक.
हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे | ही वसुंधरा प्लॅस्टिकच्या विळख्याने रडते आहे||

पर्यावरणावर दुष्परिणाम करण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत, त्यातील एक म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिक हा अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. परंतु, त्याचा वापर गेल्या काही वर्षात भरमसाठ वाढलेला आहे. त्याचा दुष्परिणाम सर्व पर्यावरणावर व मानवाच्या आरोग्यावर होत आहे.

त्यामुळे, या वर्षी प्लॅस्टिकचा वापर विशेषत: सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबद्दल आणि प्लॅस्टिकचे उत्पादन 2040 पर्यंत 60% पर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कोणते? ते आपण जाणून घेऊया.

प्लॅस्टिक हे जगातील सर्वोत्तम शोधांपैकी एक आहे. जगातील बहुतांशी सर्वच शोध प्लॅस्टिकमुळेच आपल्या हातात आलेले आहेत. परंतु, त्याचा अतिवापर आणि अयोग्य व्यवस्थापन यामुळेच या विषयावर आता गांभीर्याने दखल घ्यावी लागत आहे.

जगातील एकूण लोकसंख्या ही 730 कोटी इतकी आहे तर त्याचबरोबर या पृथ्वीवर पडून असलेलं एकूण प्लॅस्टिक याची संख्या पाहता ती 830 कोटी टन इतकी आहे. म्हणजे आज सरासरी प्रत्येक माणसाच्या नावावर अबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्या नावावर बाराशे किलो कचरा आपल्या या पृथ्वीवर पडून आहे, यापैकी काही जमिनीवर तर काही नदी, नाले,समुद्रात.

हेही वाचा :

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?.

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल