बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या(actor) नव्या टॅटूमुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. तिच्या टॅटूमुळे ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला डेट करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. चाहत्यांनी या टॅटूच्या माध्यमातून त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली आहे. दोघांनी याबद्दल अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दिशाचा(actor) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तिने फिकट निळ्या रंगाचा टॉप आणि जॉगर्स घातले आहेत. डोळ्याला गॉगल आणि हातात पांढरी पर्स आहे. या फोटोमध्ये दिशाच्या डाव्या हातावर एक टॅटू स्पष्ट दिसत आहे. या टॅटूमध्ये दोन अक्षरं आहेत. पी आणि डी. पीडी ही अक्षरं पाहून नेटकरी आता तिच्या आणि प्रभासच्या डेटिंगचा अंदाज लावत आहेत.
हा टॅटू प्रभास आणि दिशा यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांचा असल्याचा चर्चा आहेत. ते दोघेही नुकतेच ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचं नातं जुळलं असल्याचं बोललं जातंय.
तर दुसरीकडे काही नेटकरी हा टॅटू तिच्याच नावाचा असल्याचं सांगत आहेत. पीडी म्हणजेच पटानी दिशा असल्याचं तिचे चाहते सांगत आहेत. यापूर्वी दिशा ही टायगर श्रॉफ याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. आता दिशा आणि प्रभास खरंच एकमेकांना डेट करत आहेत का हे येत्या दिवसात कळेलच मात्र यामुळे दिशाचे चाहते आनंदात आहेत.
हेही वाचा :
दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची ‘ही’ योजना येईल कामी
न्याय मंदिर, न्याय देवता विद्या मंदिर, वगैरे वगैरे!
ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये ‘हा’ खेळाडू बनला रोहितचा कोच Video Viral