न्याय मंदिर, न्याय देवता विद्या मंदिर, वगैरे वगैरे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश(god mandir) धनंजय चंद्रचूड हे अनेकदा परखड मते व्यक्त करतात. त्या मागचे त्यांचे हेतू शुद्ध असल्याने त्यांची मते तपासून पाहण्याची अजिबात गरज नसते. जे प्रस्थापित बनले आहेत अशा मागासवर्गीय मंडळींनी त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचे फायदे घेऊ नयेत असे आवाहन त्यांनी काही महिन्यापूर्वी केले होते. आता कोलकाता येथे झालेल्या न्यायिक परिषदेत त्यांनी न्यायालयांना न्याय मंदिरे आणि न्यायाधीशांना न्याय देवता म्हणून नये असे आवाहन केले आहे. धर्मावर श्रद्धा ठेवून व्यवहार करणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विचार करता त्यांच्या या आवाहनास तातडीने प्रतिसाद मिळेल असे नाही. आणि त्यांनाही ते अपेक्षित नसावे.

भारतीय न्यायव्यवस्थेवर अजूनही ब्रिटिश न्याय संस्थेचा काहीसा प्रभाव आहे. न्यायाधीशांना(god mandir) माय लॉर्ड, मिलॉर्ड, अर्थात देवता म्हणण्याची ही तेव्हापासूनची परंपरा आहे. विज्ञाननिष्ठ युगातही अशा परंपरा एका रात्रीत एका दिवसात किंवा एका वर्षात खंडित होत नाहीत. त्यासाठी बराचसा काळ जावा लागतो. सर्वच धर्मात ईश्वराचे अधिष्ठान मान्य केलेले आहे. बसवेश्वर, चार्वाक, महात्मा फुले असे कितीतरी पुरोगामी आहेत की त्यांनी ईश्वर ही संकल्पना मान्य केलेली आहे. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याचा अगदी अलीकडेच एका महाप्रयोगातून शोध लावला गेला. त्याला देव कण मानले गेले आहे.

एकूणच भारतात अनेक धर्म प्रस्थापित झालेले आहेत. आणि हे धर्म परमेश्वराला मानतात. म्हणजे परमेश्वर किंवा देव हे सर्व शक्तिमान असतात, ही त्यातूनच श्रद्धा पुढे आलेली आहे. त्यातून भारतीय संस्कृती समृद्ध झालेली दिसते. ही संस्कृतीच न्यायालयांना न्याय मंदिर आणि न्यायाधीशांना न्यायदेवता, शाळांना विद्यामंदिर किंवा सरस्वतीचे मंदिर, मानते. इतकेच नव्हे तर डॉक्टर्सनाही इथे देवाच्या स्वरूपात मानले जाते. म्हणजेच या सर्व घटकांना भारतीय संस्कृतीने देवत्व बहाल केले आहे. ही सर्व दैवते जीवनमूल्य अशी निगडित आहेत म्हणूनच ती खोलवर रुजलेली आहेत.

डॉक्टरचा संबंध मानवी आरोग्याशी आहे, शिक्षणाचा संबंध प्रगतीशी आहे, न्यायालयांचा संबंध न्यायाशी आहे आणि म्हणूनच या व्यवस्था पूजनीय आणि वंदनीय आहेत. त्यातूनच न्यायमंदिर, न्यायदेवता हे शब्द संस्कृतीशी एकरूप झालेले दिसतात.

सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना न्यायालयांना(god mandir) न्याय मंदिरे, न्यायाधीशांना न्यायदेवता म्हणणे अप्रस्तुत वाटते. न्याय संस्था ही एक प्रचलित आणि वर्षानुवर्षे चालत आलेली मजबूत व्यवस्था आहे आणि ती इतर व्यवस्था प्रमाणेच आहे फरक इतकाच की ही न्याय व्यवस्था स्वायत्त आहे. म्हणूनच तिला देवत्व बहाल करू नये असे त्यांना वाटते. आता शपथ हा भारतीय संस्कृतीचा एक प्रकार आहे आणि तो न्याय संस्थेने नुसता मान्यच केला आहे असे नव्हे तर तो न्याय प्रक्रियेत महत्त्वाचा मानला गेला आहे.

कारण न्यायालयात साक्ष देताना मी सत्य आहे तेच सांगेन खोटे सांगणार नाही अशी शपथ भगवद्गगीतेवर तसेच तत्सम ग्रंथांवर हात ठेवून घ्यावी लागते. म्हणजेच इथे श्रद्धेचा भाग आला. अशीच शोधा माणसाची ईश्वरावर असते आणि हा ईश्वर विविध माध्यमातून मानव पाहत असतो. आजही प्रत्येक जण म्हणत असतो आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे. जेथे कायदे केले जातात, कायद्यात दुरुस्ती केली जाते त्या लोकसभेला ,राज्यसभेला लोकशाहीची मंदिरे म्हटले जाते. काही जणांचा अपवाद वगळला तर ईश्वरावर, देवावर प्रत्येकाची श्रद्धा असते. मंत्री पदाची शपथ घेताना अनेक जण ईश्वर साक्ष शपथ घेतात.

काहीजण गांभीर्याने सुद्धा शपथ घेतात. म्हणजे सर्वांचाच शपथ या संज्ञेवर विश्वास आहे. न्यायालय हे मंदिर आहे आणि न्यायाधीश हे न्यायदेवता आहेत. कारण या न्याय मंदिरात न्यायदेवतेकडून न्याय केला जातो असा दृढ विश्वास प्रत्येकाचा असल्यामुळे न्याय मंदिर तसेच न्यायदेवता ही विशेषण प्रत्यक्ष व्यवहारातून जाण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागेल. हे एका दिवसात एका रात्रीत एका वर्षात होणार नाही आणि ते शक्यही नाही.

न्यायालयांना न्याय मंदिर आणि न्यायाधीशांना न्यायदेवता म्हटले तर त्याचा एक प्रकारचा अनामिक ताण संबंधितांवर पडत असतो. आपण इतरांच्या पेक्षा फार वेगळे आहोत अशी मानसिकता तयार होण्याची शक्यता असते म्हणूनच अशा प्रकारची विशेषणे लावू नयेत हा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा आग्रह किंवा मत अनाठायी आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांनी अशा प्रकारचे मत किंवा विचार व्यक्त करणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांचे विचार प्रगल्भ आहेत असे नक्कीच म्हणता येईल.

एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा त्याचा आरक्षणाचे फायदे घेतले जाऊ नयेत. प्रस्थापित मागासवर्गीयांनी आरक्षणाचे फायदे नाकारले तर ते अन्य इच्छुक मागासवर्गीयांना मिळू शकतात. अशी सरन्यायाधीशांची भूमिका आहे आणि ती स्वागतार्हआहे. अशा प्रकारची स्वच्छ आणि शुद्ध हेतूची भूमिका न्याय संस्थेच्या प्रमुखांकडून घेतली जाते आणि म्हणूनच न्याय मंदिर आणि न्याय देवता म्हटले जाते.

हेही वाचा :

ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये ‘हा’ खेळाडू बनला रोहितचा कोच Video Viral

दारूच्या नशेत भांडण, मित्राने मित्राला बाल्कनीतून ढकलले

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एअरपोर्टवर एकत्र स्पॉट