लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या

लसूण हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येक स्वयंपाकघरात (garlic)वापरला जाणारा लसूण हा अत्यावश्यक पदार्थ आहे. अशातच वेळ वाचवण्यासाठी व सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत अनेक महिला लसूण आधीच सोलून फ्रिजमध्ये ठेवतात, पण लसूण सोलून साठवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पण ही पद्धत योग्य आहे का? याबाबत अनेकांचा प्रचंड गोंधळ उडतो. सोलून ठेवलेले लसूण फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही आणि ते साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो हे आपण आहारतज्ञ डॉ मेधवी गौतम यांच्याकडून जाणून घेऊया.

सोलून ठेवलेले लसूण फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर याचे उत्तर थोडे मिळतं जुळतं आहे. डॉ.मेधवी गौतम यांनी सांगितले की, तुम्ही लसूण सोलून साठवून ठेवू शकता, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लसणात नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, परंतु जेव्हा ते सोलून ठेवले जाते तेव्हा ते लवकर खराब होते आणि त्यात बुरशी किंवा(garlic) बॅक्टेरिया वाढण्याचा धोका देखील वाढतो. विशेषत: जर ते योग्यरित्या साठवले गेले नाही तर, ओलाव्याने लसुन लवकर खराब होण्याची शक्यता आहे.

सोलून ठेवलेले लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याचे नुकसान लसणाची मूळ चव आणि त्याचा तीव्र सुगंध हळूहळू कमी होऊ लागतो.सोलून ठेवलेल्या लसूणमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात, विशेषत: तुम्ही हवाबंद डब्यात ठेवले नाही तर.रेफ्रिजरेटरमध्ये जास्त ओलावा असल्यास, लसूण मऊ होऊन खराब होऊ लागतो आणि त्यात हिरवी किंवा काळी बुरशी लागु शकते.सोललेला लसूण फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवल्यास त्यात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनमसारखे जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

जर तुम्हाला खरोखर वेळेची बचत करायची आहे आणि सोलून ठेवलेले लसूण साठवायचे असल्यास या काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये लसून साठवून ठेवल्यास यामध्ये ओलावा आणि हवा आत जाण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे लसूण जास्त काळ (garlic)ताजे ठेवता येतात. जर तुम्ही सोललेला लसूण हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवत असाल तर त्याची शेल्फ लाइफ फक्त 7 ते 10 दिवस आहे. या कालावधीत तुम्हाला ते वापरावे लागेल.

सोललेले लसूण साठवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ते ऑलिव्ह ऑईल किंवा कोणत्याही खाद्यतेलात बुडवून ठेवणे. हे केवळ त्याची चव टिकवून ठेवणार नाही, शिवाय ते जास्त काळ खराब होत नाही.जर तुम्हाला सोललेले लसूण जास्त काळ साठवायचे असेल तर सोललेल्या लसणाची पेस्ट बनवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. ही पद्धत सर्वात सोपी आहे.लसूण सोलून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे पूर्णपणे चुकीचे नाही, परंतु ते योग्यरित्या साठवणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही सोललेले लसूण असेच पॅक न करता ठेवल्यास लवकर खराब होऊ शकते आणि आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरू शकते. म्हणून, जर तुम्हाला सोललेला लसूण साठवायचा असेल तर ते पेस्टच्या स्वरूपात हवाबंद डब्यात, किंवा तेलात बुडवून फ्रीजरमध्ये ठेवणे चांगले.

हेही वाचा :

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का…

भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या