25 जूनपासून जोरदार बरसणार, राज्यात यावर्षी जास्त पावसाचा अंदाज आहे

महाराष्ट्रात मान्सून (monsoon) सक्रिय झालाय. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झालाय. आता हवामान खात्याने (IMD) मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 ते 27 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे (monsoon) ६ जून रोजीच कोकणात आगमन झाले होते. त्यानंतर 8 जूनला पुण्यात आणि 9 जूनला मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मान्सून दाखल झाला होता. मात्र मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात दाखल झाल्यानंतर उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय.

या आठवड्यात मुसळधार पाऊस

राज्यात आता मान्सूनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी (monsoon) अनुकूल बदल दिसून आला आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा :

आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला

वेस्ट इंडिजचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न काही क्षणात भंगलं

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे