‘जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या’; जयंत पाटलांचा काँग्रेसच्या विशाल पाटलांना सल्ला

सांगली : जिल्ह्यात एकास एक लढत झाल्यास भाजपचा(political marketing) पराभव शक्य आहे. ‘सांगली’बाबतचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये, सांगलीत योग्य लढत व्हावी, यासाठी मी पुढाकार घेतला होता, तरीही काहीजण सोशल मीडियाद्वारे माझ्याबद्दल अपप्रचार करीत आहेत. महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार वरिष्ठ पातळीवरून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केला आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

आता एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या(political marketing) पाठीशी राहावे. जुना इतिहासातील वाद नको, भविष्याचा विचार करा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही, असा टोलाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता येथे लगावला.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्यात १० जागा घेऊन आघाडी राहावी, ही भूमिका घेतली आहे. ‘सांगली’ची जागा मागितली नाही. संयुक्त पत्रकार परिषद होऊन निर्णय झाला आहे. भाजपसमोर एकच उमेदवार द्यायचा प्रयत्न आहे. एकास एक उमेदवार झाल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो. सांगलीलादेखील असंच व्हायला पाहिजे, असं आमचं मत आहे. ‘सांगली’ची जागा शिवसेनेने मागितली होती.’’

ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर’बाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. ‘सांगली’च्या निर्णयाबद्दल मी बोलणं योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, सांगलीच्याबाबतीत मी त्या-त्या वेळी सगळं सांगितलं आहे. सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असं आमचं मत आहे. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे.’’

उद्धव ठाकरेंनी थेट सांगलीची जागा जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीवरून सुरू असलेल्या वादावर अनेकांनी जयंत पाटील यांच्याकडे रोख दाखवला आहे. या सगळ्या वादावर अखेर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘‘सांगलीबाबत सोशल मीडियावर मला जबाबदार धरलं जात आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं, हे बघितलं पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपविरोधात ताकद एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झालं, हे मी आता बाहेर सांगणं योग्य होणार नाही. जे लोक माझ्याबाबत वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावं, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे. अर्ज माघारीपर्यंत काहीही होभ शकते.

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे, राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी तो जाहीर केला. सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला. जुन्या वादाबाबत जयंत पाटील म्हणाले, ‘‘दादा-बापू इतिहासातील वाद रंगवला जात आहे. मात्र या दोघांमध्ये मतभेद नव्हते. ते आता वर एकत्र बसून चहा पित असतील. जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या.’’

राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून, त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकसभेला ३२ ते ३३ जागा मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या वेळी आमदार अरुण लाड, शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बाळासाहेब पाटील, राहुल पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

प्रकाश आवाडे यांचं औट घटकेचं आव्हान…!

X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार

वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्याकडून सूचक संकेत