राज ठाकरेंकडून मुलांच्या शाळेबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी

मुंबई- राज्यात उष्णतेची लाट(waveapps) आली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. वाढत्या उन्हाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून काही सूचना केल्या आहेत.

राज ठाकरे(waveapps) आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, असं राज ठाकरे म्हणालेत.

उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा, अशा सूचना राज यांनी केलं आहे.

हेही वाचा :

X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार

‘जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या’; जयंत पाटलांचा काँग्रेसच्या विशाल पाटलांना सल्ला

वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्याकडून सूचक संकेत