जत : ‘‘गेल्या दहा वर्षांत संजय पाटील पाच मिनिटेही लोकसभेत(tapping) बोलले नाहीत. जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात धन्यता मानली. जनतेला थापा मारण्यात ते पटाईत आहेत. दुसरीकडे, जयंत पाटील काड्या घालण्यात पटाईत आहेत,’’ अशी जोरदार टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ(tapping) बनाळी, शेगाव, डफळापूर येथे सभांचे आयोजन केले होते. जगताप म्हणाले, ‘‘विशाल पाटील यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येतात. संजय पाटील यांना हिंदी, इंग्रजी बोलता तरी येते का? दहा वर्षांत पाच मिनिटे तरी लोकसभेत बोलले का? रांजणीचा डायपोर्ट, कवलापूरच्या विमानतळाचा पाठपुरावा केला का? पंढरपूर-विजापूर ब्रॉडगेजचा सर्व्हे झाला, पाठपुरावा केला नाही. सर्व नेत्यांनी संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.’’
ते म्हणाले, ‘‘भाजपला संविधानात बदल करण्यासाठी ४०० खासदार हवे आहेत. मोदी-शहा देश विकत आहेत. मूठभर लोकांच्या हाती सत्ता एकवटत आहे. वसंतदादा, राजारामबापू असे दोन गट होते. वैचारिक मतभेद होते. त्यांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्ला केला नाही. आता माझ्यावर हल्ला होतोय.’’
विशाल पाटील म्हणाले, ‘‘भाजपच्या धोरणाला विरोध करण्याचे काम काँग्रेसने केले. जिल्ह्यात पाण्यावरून राजकारण सुरू आहे. कोयना धरणातून पाणी सोडले जात नव्हते तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो. निवडणूक जवळ आली आणि ऐनवेळी ‘मॅच फिक्सिंग’ करून काँग्रेसला, वसंतदादा घराण्याला उमेदवारी मिळू नये, यासाठी डाव रचला गेला.
नुरा कुस्ती करायची, संजय पाटील यांना पुन्हा निवडून आणण्याचे षड्यंत्र होते. त्यांच्यावर देवाची कृपा नाही. ही राक्षसी वृत्ती आहे. संजय पाटील यांनी अॅडजेस्टमेंट, सेटलमेंट केली. दहा वर्षे खासदार, तत्पूर्वी सहा वर्षे आमदार सेटलमेंट करूनच झाले. त्यांनी त्यांच्या सत्ता काळात काय केले, याचे आधी उत्तर द्यावे.’’
हेही वाचा :
शिंदेंची मोठी खेळी, ठाकरेंच्या निकटवर्तीयाला उमेदवारी जाहीर
इचलकरंजीत उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात याची जाहीर सभा
धोनीसोबत प्रेम म्हणजे नावावर भलामोठा डाग..! का केले या अभिनेत्रीने धोनीवर इतके मोठे आरोप?