शिंदेंच्या शिवसेनेवर कमळाबाईचा कंट्रोल; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

बऱ्याच प्रतीक्षेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे(congress) गटाच्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आलीये. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर(congress) एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केलीये.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

“भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मागच्या वेळी जितकी मतं मिळाली त्यापेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल.”, असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं.

हेही वाचा :

‘मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर….’ संजय राऊतांचा हल्लाबोल

सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला जग्गूदादाने डोक्यात मारली टपली नेटकरी म्हणाले..

ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; ‘या’ कंपनीने आणली नवी पॉलिसी