“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा(working experience) चाहता वर्ग मोठा आहे. अक्षयची एक झलक पाहण्याची तसेच त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अनेकांना असते.अक्षय हा सध्या त्याच्या बड़े मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अक्षयनं हजेरी लावली. यावेळी अक्षयनं त्याच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. अक्षयनं सांगितलेल्या या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अक्षयनं टायगर(working experience) श्रॉफसोबत रणवीर अल्लाबदियाच्या द रणवीर शो या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी रणवीरनं अक्षयला त्याच्या चाहत्याबद्दलची एक आठवण शेअर करायला सांगितली. यावेळी अक्षय म्हणाला, “एकदा गर्दीतील लोकांना मी शेकहँड करत होतो. अचानक माझ्या हातातून रक्तस्त्राव सुरु झाला. मग मला समजले की, त्या गर्दीमधील एका चाहत्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होत आणि त्याने माझा हात कापला होता.”

द रणवीर शो या पॉडकास्टमध्ये अक्षयनं त्याच्या लाईफस्टाईलबद्दल, फिटनेसबद्दल देखील सांगितलं. अक्षयनं त्याच्या डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी तयार केलेल्या मिम्सबद्दल देखील सांगितलं. अक्षय त्या मिम्सबद्दल म्हणाल्या, “मी ते मिम्स पाहून खूप हसतो.”

अक्षय आणि टायगर श्रॉफचा बड़े मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट अली अब्बास जफरनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. हा 10 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अक्षयचा वेलकम टू द जंगल हा कॉमेडी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अर्शद वारसी, संजय दत्त,रवीना टंडन,लारा दत्ता,जॅकलिन फर्नांडिस,दिशा पटानी,श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा :

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

महाराष्ट्र हादरलं! 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा