‘मला माफ करा पण, ‘या’ दोन खेळाडूंसोबत…’, रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट

टीम इंडियाचा स्टार कॅप्टन रोहित शर्मा(hotel room) सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली खेळतोय. त्यामुळे रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत देखील होता. रोहित शर्मा गेल्या 17 वर्षापासून टीम इंडियामध्ये खेळतोय. त्यामुळे रोहित नेहमी कडू गोड आठवणी सांगत असतो. अशातच द ग्रेट इंडियन क्रिकेट शर्मा शोमध्ये बोलताना रोहित शर्माने शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यावर एक वक्तव्य केलं. त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

कपिल शर्माने रोहित शर्माला प्रश्न(hotel room) विचारला. यामध्ये कपिलने विचारलं की, असा कोणता प्लेयर आहे, ज्याच्यासोबत रुम शेअरिंग करायला आवडत नाही? त्यावर रोहित म्हणला की, आता प्रत्येक खेळाडूंनी वेगवेगळ्या रुम भेटतात. त्यावर श्रेयस अय्यरने देखील रोहितच्या वाक्याला समर्थन दिलं.

आता प्रत्येकाला वेगवेगळ्या रुम भेटतात, त्यामुळे असा काही विषय नसतो, असं श्रेयस म्हणतो. पुढे उत्तर देताना रोहितने दोन खेळाडूंची नावं घेतली. दोन खेळाडू असे आहेत, ज्यांच्यासोबत रुम शेअर करायला आवडणार नाही. एक म्हणजे शिखर धवन आणि दुसरा म्हणजे ऋषभ पंत… यावर कपिलने रोहितला कारण देखील विचारलं.

मला माफ करा पण यांच्यासोबत रुम शेअर करायला मला आवडणार नाही, असं रोहित शर्मा हसत सांगतो. कपिलने रोहितला याचं कारण विचारलं तेव्हा, खुप घाणेरडी लोकं आहेत यारर.. प्रॅक्टिसवरून आली की, कपडे इतकं तिकडं फेकून देणार, यांच्या रुमवर नेहमी डीएनडी बोर्ड लावलेला असतो. कारण ही दोघं 1-1 वाजेपर्यंत झोपलेली असतात. हाउसकीपिंगला दरवाजा उघडावा लागतोय.

त्यामुळे यांच्या रूम 4 -5 दिवस तशाच अस्वच्छ असतात, असं रोहित शर्मा म्हणतो. यांच्या रुम अस्वच्छ असतात, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, त्यामुळे मला नाही वाटत की मी त्यांच्यासोबत राहु शकतो, असं रोहितने सांगितलं.

दरम्यान, रोहितने यावेळी वर्ल्ड कप फायनलच्या जखमेवर देखील मनातील भावना बोलून दाखवल्या. आमच्या टीमने नक्कीच वर्ल्ड कपच्या 10 मॅच चांगल्या खेळल्या. मात्र, आम्हालाही वाटलं होतं की वर्ल्ड कप भारतात खेळवला जातोय त्यामुळे टीम इंडिया जिंकवी. पण ऑस्ट्रेलिया नक्कीच चांगली खेळली, असं रोहितने म्हटलं आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरलं! 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव