श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये(trophy) आहे. या संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या शानदार कामगिरीनंतर गौतम गंभीरवर देखील कौतुकाचा वर्षाव केला जातोय. या कामगिरीचं श्रेय गौतम गंभीरला देताना दिसून येत आहेत. यादरम्यान श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांच्यातील एक कनेक्शन समोर आलं आहे. काय आहे ते खास कनेक्शन? जाणून घ्या.
कोलकाता नाईट रायडर्स(trophy) संघाने आतापर्यंत २ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. हे दोन्ही जेतेपदं गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळताना पटकावली आहेत. २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळण्यापूर्वी गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१० मध्ये दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. २०११ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात स्थान दिलं. त्याच्यावर १४.९ कोटींची बोली लावली गेली. पुढच्याच हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद जिंकून दिलं. असंच काहीसं चित्र श्रेयस अय्यरबाबत पाहायला मिळालं आहे.
गौतम गंभीरप्रमाणेच श्रेयस अय्यर देखील आधी दिल्लीकडून खेळायचा. २०१८ मध्ये गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२१ पर्यंत तो दिल्लीचा कर्णधार होता.
त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आलं. २०२२ मध्ये झालेल्या लिलावात तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. गंभीर प्रमाणेच त्याला संघाचं कर्णधार बनवण्यात आलं. योगायोग म्हणजे कोलकाताचा संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता.
या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीचे ३ सामने जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता योगायोग तर जुळला आहे. मात्र श्रेयस अय्यर गौतम गंभीरप्रमाणेच कमाल करून दाखवणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु
अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाला अटक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई