कोल्हापूर प्रतिनिधी : कारसह ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त : आंबेवाडी गावाजवळ(police) कारवाई. करवीर पोलीसांकडून आपल्या हद्दीत रात्री गस्त सुरू होती. प्रत्येक संशयास्पद वाहनांची कसून चौकशी केली जाते. शनिवारी रात्री करवीर पोलीसांच्या गस्ती पथकाने कोल्हापूर पन्हाळा रोडवर आंबेवाडी गावाजवळ सापळा रचून अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणारी कार ताब्यात घेतली. यातील १ लाख ७० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयीत पांडुरंग धोंडीराम पाडेकर (वय ५८ रा. पाटील गल्ली,निवडे,ता.पन्हाळा) यास अटक केली आहे.
करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस(police) निरीक्षक किशोर शिंदे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना शनिवारी रात्री कोल्हापूर पन्हाळा रोडवर दुचाकीवरून गस्त घालण्यास सांगितली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर कर्मचारी संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवून होते. काही वाहनांची तपासणीही केली जात होती.
पांढऱ्या रंगाच्या कारमधून एक व्यक्ती बेकायदेशिर देशी विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती या पथकाला खबऱ्याकडून समजली होती. त्यानुसार पोलीसांनी वडणगे फाटा ते आंबेवाडी गावातील पेट्रोल पंपापर्यंयत सापळा रचला होता. साध्या वेषातील पोलीस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून होते. पांढऱ्या रंगाची कार दिसताच ती आडवण्यात आली. तेव्हा कारमधील चालकास कारमध्ये काय आहे? अशी विचारणा केल्यानंतर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.
त्याला पोलीसी खाक्या दाखवताच चालक आपण देशी विदेशी बेकायदा तरूची तस्करी करीत असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याच्या कारमधून १ लाख ७० हजार रुपयांची वेगवेगळ्या कंपनीची दारू जप्त केली. अंमलदार सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, योगेश शिंदे, अमित जाधव, विजय पाटील, धनाजी बरगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हेही वाचा :
महाराष्ट्र हादरलं! 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम
‘मला माफ करा पण, ‘या’ दोन खेळाडूंसोबत…’, रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट
“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव