कोल्हापूरात नियमांचा बट्ट्याबोळ अन् यंत्रणेचा अभाव; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ( 7 मे ) चुरशीने(viral) पार पडत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अटीतटीचे लढत होत असताना काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले आहेत.

सोशल मीडियावरून मतदान केलेले व्हिडिओ व्हायरल(viral) करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. असं असताना आयोगाच्या या नियमाला सोशल माध्यमावरील नेटकऱ्यांनी धाब्यावर बसवत मतदान करतानाचे व्हिडीओ सर्सास व्हायरल केले आहेत. हे व्हिडीओ महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या फॅन पेजवर उघडपणे दिसत आहेत.

एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वोत्तरी यंत्रणा सज्ज झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले आहे. पण, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर यंत्रणेचा अभाव दिसत आहे. येणाऱ्या मतदारांसह कर्मचाऱ्यांना देखील पाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन गांभीर्याने घेऊ पाहत असताना यंत्रणेतील त्रुटी कायम आहेत.

मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी असताना अनेक कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर थेट जाऊन मोबाईल चित्रण करून मतदान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना प्रशासकीय यंत्रणेमध्ये अभाव दिसत आहे.

हेही वाचा :

हातकणंगलेमध्ये गोंधळ, धैर्यशील माने आणि सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कोल्हापुरात मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या