लखनौ सुपर जायंट्‌स‌चे पारडे जड! दिल्ली कॅपिटल्ससमोर कामगिरी सुधारण्याचे आव्हान

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत असलेला लखनौ सुपर जायंट्‌स‌चा संघ आणि सुमार कामगिरी करीत तळाला असलेला दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals)संघ यांच्यामध्ये आज लखनौत लढत रंगणार आहे.


आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत असलेला लखनौ सुपर जायंट्‌स‌चा संघ आणि सुमार कामगिरी करीत तळाला असलेला दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals)संघ यांच्यामध्ये आज लखनौत लढत रंगणार आहे. दिल्लीसमोर कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. लखनौचा संघ सलग चौथा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील.
कर्णधार के. एल. राहुल व क्विंटॉन डी कॉक यांच्या रूपात लखनौकडे अनुभवी सलामीचे फलंदाज आहेत. डी कॉक याने दोन अर्धशतकांसह आपली चमक दाखवली आहे; पण राहुलला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. आश्‍वासक सुरुवातीचे त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलेले नाही. मधल्या फळीत निकोलस पूरन आपला ठसा उमटवत आहे. अखेरच्या षटकांमध्ये त्याच्याकडून छान कामगिरी होत आहे. लखनौसाठी देवदत्त पडिक्कल याचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. संघ व्यवस्थापन तो फॉर्ममध्ये येण्याची वाट पाहात असतील.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लखनौलाच नव्हे तर भारताला युवा वेगवान गोलंदाज गवसला आहे. मयंक यादव हे त्याचे नाव. ताशी १५० किलोमीटरच्या वेगाने तो सातत्याने गोलंदाजी करीत आहे; पण गुजरातविरुद्धच्या लढतीत दुखापतीमुळे त्याला माघारी जावे लागले. या लढतीत तो एकच षटक टाकू शकला. दिल्लीविरुद्धच्या लढतीलाही तो मुकणार हे निश्‍चित आहे. त्याच्या अनुपस्थितीत लखनौला इतर गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नवीन उल हक, यश ठाकूर, कृणाल पंड्या व रवी बिश्‍नोई या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे. यश ठाकूर याने गुजरातविरुद्धच्या लढतीत ३० धावा देत पाच फलंदाज बाद केले आणि लखनौचा विजय पक्का केला.

पंत, स्टब्स वगळता इतरांकडून निराशा

दिल्लीच्या संघाला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही. कर्णधार रिषभ पंत (१५३ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१७४ धावा) या दोन खेळाडूंनी दोन अर्धशतके झळकावत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, इतर खेळाडूंची त्यांना साथ लाभत नाही. डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ललित यादव यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. या स्पर्धेचा पूर्वार्ध जवळपास संपुष्टात येत असून उत्तरार्धाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टिने प्रत्येक लढतीतील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
नॉर्कियाच्या फॉर्ममुळे चिंता

दिल्लीच्या फलंदाजांना अपयश येत असतानाच त्यांच्या गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्कियाचा सुमार फॉर्म त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरीत आहे. त्याने चार सामन्यांमधून सहा फलंदाज बाद केले आहेत. याचप्रसंगी त्याच्या गोलंदाजीवर १३.४३च्या सरासरीने धावांची लूट करण्यात आली आहे. खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेशकुमार, झाय रिचर्डसन यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी झालेली नाही. अक्षर पटेल अधूनमधून छान कामगिरी करीत आहे; पण त्यालाही कामगिरीत सातत्य आणायला हवे. एकूणच काय तर सर्वच बाबतीत दिल्लीला कामगिरी उंचावण्याची गरज आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन

PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत