महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महायुतीने रणनीती आखली, एकनाथ शिंदे प्रमुख जबाबदाऱ्यांसह केंद्रस्थानी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत(election) भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच आता येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाने विधानसभेसाठी 288 पैकी 100 जागांची मागणी केली आहे. या मागणीला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होताना दिसत आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेंना झुकते माप दिल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली, तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागू शकते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदेगट अधिक आग्रही राहण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे गटाने भाजपकडे 288 पैकी 100 जागांची मागणी केली आहे. मात्र भापजच्या स्थानिक नेतृत्वाकडून इतक्या जास्त जागा देण्यास विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

लखनौ-आग्रा द्रुतगतीमार्गावर बस-टँकरची भीषण टक्कर: १८ ठार, २० जखमी

बोगस आधारकार्डाच्या फेऱ्यात अडकली महिला, 14 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम