महाविकास आघाडीची आज पुण्यात सभा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस(congress) शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा मंगळवारी (ता. ३०) होणार आहे.


पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (congress)शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा मंगळवारी (ता. ३०) होणार आहे.

ही सभा वारज्यातील आर. एम. डी. कॉलेजच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होईल. सुळे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. तिन्ही पक्षांचे अनेक नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कॉंग्रेस, पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला महाविकास आघाडीचे नेते कसे प्रत्युत्तर देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

हातकणंगले लढाई सोपी नाही…धैर्यशील मानेंच्या गावातच मत विभाजन

कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…

“इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं”; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा