आगामी काळात होत असलेली लोकसभेची ही निवडणूक व्यक्तिगत नाही, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे.(minister) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनीं महायुतीच्या पाठीशी उभे राहावे. या निवडणुकीत देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि विकास डोळ्यासमोर ठेवून लढवतोय. या अर्थव्यवस्थेला पंतप्रधान मोदी यांनी 11 व्या वरून 5 व्या क्रमांकावर आणले आहे. आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोल्हापूर व हातकणंगले येथील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी(minister) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,कोल्हापूरमध्ये उपस्थित होते. यावेळी महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने येथील महायुतीचे उमेदवार आहेत. कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार हे निवडून येतील. संकटात ही कोल्हापूर नेहमीच पाठीशी उभे राहते. आपली लढाई ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. गेल्या काही दिवसापासून मी विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. आधीच सरकार हे घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते. पण मी पहाटेपर्यंत काम करतो. माझ्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 तास काम करतात. घरात बसून कामं करणारे हे सरकार नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या मनात आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
देशात गेल्या 50 वर्षात झालं नाही ते 10 वर्षात झाले आहे. काँग्रेसला जाहीरनामा जाहीर करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनाफा दिला पाहिजे. काँग्रेसने देशाला खड्यात घातले आहे. म्हणून मोदी सरकार एक गॅरेंटी आहे. मोदी सरकार विकासाला महत्व देणार आहे, त्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करता येत नाही. पण विरोधकांनी आरोप केले त्यांचे विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी आवश्यक आहेत तेवढे खासदार निवडून आले नाहीत. ते एकमेकांच्या पायात पाय घालून पडणार आहेत. जब तक सुरज चांद रहेंगा तब तक संविधान को कूच नही होगा. प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आज कोल्हापूर जाम होते. ये तो बस ट्रेलर हे पिच्चर अभी बाकी आहे. ही जनतेची निवडणूक आहे, जनताच महायुतीला विजयी करणार, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
बेरोजगारी रोखण्यासाठी मोदी-योगींनी एकही मुल…; खासदाराचा व्हिडिओ डीपफेक असल्याचा भाजपचा दावा
रोहित शर्मासाठी पंजाब किंग्सची मालकीन प्रीति झिंटाने लावली फिल्डिंग!
तिहार तुरुंगातच राहणार केजरीवाल, न्यायालयाने वाढवली न्यायालयीन कोठडी