महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

बॉलिवूड महिमा चौधरी आणि तिची लेक अरियाना ‘नादानियां’ च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचल्या होत्या. त्यावेळी अरियानानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या चित्रपटात(Entertainment news) महिमाची देखील एक महत्त्वाची भूमिका आहे आणि सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत खुशी कपूर देखील होती. शौना गौतमच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटानं तिच्या प्रदर्शनाच्या आधीच सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

17 वर्षांच्या अरियानानं तिच्या सुंदर लूक आणि आईसाराखा चेहऱ्यासाठी ओळखली जाते. या कार्यक्रमात महिमाची बहीण आकांशा चौधरी आणि तिचा मुलगा रयान देखील आला होता. त्यामुळेच महिमासाठी हा आठवणीत राहिलेला एक खास रेडकार्पेट ठरला. प्रत्येक व्यक्ती हे अरियानाकडेच पाहत होतं आणि तिच्याविषयी बोलत होतं की तिची उंची आणि चेहरा दोन्ही चांगलं आहे.

महिमा चौधरीनं (Entertainment news)2013 मध्ये बॉबी मुखर्जीला घटस्फोट दिला. त्यानंतर तिनं अरियाला लहाणाचं मोठं केलं. महिमानं तिच्या लेकीसाठी सगळं काही केलं. तिनं तिच्या खासगी आयुष्यात आणि प्रोफेशन्ल आयुष्यात बॅलेन्स देखील बनवला आहे.

याविषयी सगळ्यांना माहित आहे की महिमानं 19 मार्च 2006 रोजी बॉबी मुखर्जी यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी बॉबी घटस्फोटीत होते आणि एक नवीन सुरुवात करणार असून त्याच्या शोधात आहे. दोघांनी 2007 मध्ये त्यांची वेक अरियानाचं स्वागत केलं. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्यामुळे 2013 मध्ये त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

लक्षवेधी गोष्ट ही आहे की महिमाची बहीण आकांक्षा चौधरी देखील सिंगल मदर आहे. दोन्ही बहिणी त्यांच्या मुलांचा स्वत: सांभाळ करत आहेत. तर आपल्या लग्नाच्या आधी महिमा टेनिस स्टार लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. खरंतर, ब्रेकअपनंतर बॉबी मुखर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये आली. पण त्यांच्यासोबत तिचा सुखी संसार राहिला नाही. महिमाचे आजही लाखो चाहते आहेत. तिचे चाहते आजही तिला पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात.

हेही वाचा :

राम गोपाल वर्मा यांना अटक होण्याची शक्यता! 

IPL सुरु होण्यापूर्वी मुकेश अंबानी घेणार मोठा निर्णय

‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले