सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक पौष्टिक शेवयांचा उपमा

सकाळच्या नाश्त्यात(breakfast) नेहमी नेहमी काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी एकत्र बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात किंवा घरी उपलब्ध असलेले कोणतेही स्नॅक्स खाल्ले जाते.

पण असे न करता नाश्त्यामध्ये(breakfast) पोटभर आणि शरीराला सहज पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात बनवण्यासाठी सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही शेवयांचा उपमा कमीत कमी साहित्यामध्ये झटपट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शेवयांचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • शेवया
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • गाजर, मटार
  • मोहरी
  • चणा डाळ
  • शेंगदाणे
  • कढीपत्ता
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर

कृती:

  • शेवयांचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेवया भाजून घ्या. लालसर रंग आल्यानंतर शेवया काढा.
  • त्याच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, उडीद डाळ, सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
  • नंतर त्यात हिरवी मिरची, कांदा घालून व्यवस्थित भाजून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात इतर सर्व भाज्या टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भाज्यांना उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात शेवया टाकून मिक्स करा.
  • 5 मिनिटं शेवया व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.

हेही वाचा :

सैफ अली खानवर आणखी एक संकट, सरकार करणार कारवाई

१० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

ठाकरेंना आणखी एक धक्का; ३५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नवा पक्ष ठरला