मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात मिक्स भाज्यांचा वापर करून भोगीची (Bhogi Bhaji)भाजी बनवली जाते. या दिवशी भोगीच्या भाजीला विशेष महत्व आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच भाज्या उपलब्ध असतात.
पण घरी भोगीची भाजी(Bhogi Bhaji) बनवता भाजीचे प्रमाण चुकीचे होते. यामुळे भाजीची चव पूर्णपणे बिघडून जाते. भाजीची चव बिघडल्यानंतर भाजी खावीशी वाटतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवावी, याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने भोगीची भाजी बनवल्यास पदार्थाची चव खराब होणार नाही. तुम्ही बनवलेली भाजी घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
साहित्य:
मटार
हरभरे
तूर
वालाच्या शेंगा
शेंगदाणे
तेल
मीठ
घेवड्याच्या शेंगा
वालाच्या शेंगा
गाजर
बटाटे, वांग, टोमॅटो, कांदा
खोबऱ्याचं वाटणं
कृती:
भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या माध्यम आकारात कापून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात सर्व भाज्या टाकून व्यवस्थित परतून घ्या.
कुकरमध्ये तेल टाकून ते व्यवस्थित गरम करून घ्या. त्यानंतर त्यात वाटणं घालून व्यवस्थित भाजून घ्या.
वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, इतर सर्व मसाला टाकून व्यवस्थित मसाला मिक्स करा.
मसाला भाजल्यानंतर त्यात सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
भाज्या शिजल्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून भाजी सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोगीची भाजी.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव
आज भोगीच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींचं नशीब उजळणार, धनलाभाचेही संकेत
Viral Video: लोकमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; एकमेकींच्या झिंझ्या उपटत धु धु धुतले