उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स

महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो. यादिवशी भगवान (fasting)शंकराची मनोभावे पूजा करून नंतर उपवास सोडला जातो. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी, भगर, शेंगदाण्याची आमटी किंवा साबुदाणे वडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही उपवासाचे कटलेट्स बनवू शकता. तुम्ही बनवलेले कटलेट्स लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतील. याशिवाय उपाशी पोटी साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी (fasting)कुरकुरीत कटलेट्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

साहित्य:
उकडलेला बटाटा
साबुदाणे
शेंगदाण्याचा कूट
हिरव्या मिरचीची पेस्ट
मीठ
उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड, नोट करा रेसिपी

कृती:
उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून कुकरमधून उकडवून घ्या. बटाटे पूर्णपणे शिजल्याशिवाय गॅस बंद करू नये.
त्यानंतर मिक्सरमध्ये साबुदाणे टाकून बारीक पावडर तयार करा. उकडवून घातलेला बटाटा थंड करून साल काढून घ्या.
थंड करून घेतलेला बटाटा व्यवस्थित मॅश करून (fasting)नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साबुदाण्याची पावडर आणि शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
मिक्स करून झाल्यानंतर त्याचे कटलेट्स तयार करून गरम तेलात व्यवस्थित भाजून घ्या. लालसर रंग आल्यानंतर कटलेट्स काढा.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे कटलेट्स. हा पदार्थ तुम्ही काकडीच्या चटणीसोबत सोबत खाऊ शकता.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट