मन धोनीनं सामना जिंकला केएलनं!

लखनौचा नवाबी थाट काही औरच असतो! लखनौ सुपर जायंट्सचा (lucknow super giants)सामना सीएसकेसोबत होणार म्हटल्यावर शहरभर पोस्टर लावली…

पोस्टरचा विषय काय तर धोनी! लखनौच्या (lucknow super giants)या नवाबी थाट असलेल्या चाहत्यांना धोनीनं षटकारांची आतशबाजी करावी अन् केएल राहुलनं सामना जिंकावा असं देखील वाटत होतं. लखनौचे चाहते दोन्ही दगडांवर हात ठेवून होते. या नवाबी चाहत्यांना ना धोनीनं निराश केलं ना केएल राहुलनं!

लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् धोनीला सामना जिंकून देण्यापासून रोखलं. कारण धोनीला आता चेस करायला नाही तर टोटल उभारायला यावं लागणार होतं. धोनी आला अन् त्यानं लखनौच्या चाहत्यांच मन देखील जिंकलं! अवघ्या 9 चेंडूत 28 धावा कुटल्या. त्यात एक स्कूप शॉट खेळून नवाबी चाहत्यांना नवाबी नजराणा पेश केला. सीएसकेनं लखनौसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं.
लखनौचा नवाबी थाट काही औरच असतो! लखनौ सुपर जायंट्सचा सामना सीएसकेसोबत होणार म्हटल्यावर शहरभर पोस्टर लावली… पोस्टरचा विषय काय तर धोनी! लखनौच्या या नवाबी थाट असलेल्या चाहत्यांना धोनीनं षटकारांची आतशबाजी करावी अन् केएल राहुलनं सामना जिंकावा असं देखील वाटत होतं. लखनौचे चाहते दोन्ही दगडांवर हात ठेवून होते. या नवाबी चाहत्यांना ना धोनीनं निराश केलं ना केएल राहुलनं!

लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् धोनीला सामना जिंकून देण्यापासून रोखलं. कारण धोनीला आता चेस करायला नाही तर टोटल उभारायला यावं लागणार होतं. धोनी आला अन् त्यानं लखनौच्या चाहत्यांच मन देखील जिंकलं! अवघ्या 9 चेंडूत 28 धावा कुटल्या. त्यात एक स्कूप शॉट खेळून नवाबी चाहत्यांना नवाबी नजराणा पेश केला. सीएसकेनं लखनौसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं.
केएल बाद झाल्यानंतर निकोलस पूरननं गडबड न करता लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनौ अन् चेन्नईच्या सामन्याचं वर्णन करायचं झालं तर सगळं कसं गुडी गुडी झालं! धोनी 2.0 चा साक्षीदार झाल्यानं थलाचे फॅन खूश अन् लखनौनं सीएसकेला मात देत सामना जिंकल्यानं केएलचा संघही खूश! बाकी सामना जिंकूनही गुणतालिकेत लखनौचे स्थान काही बदलेलं नाही! ते रनरेटमध्ये मागं पडल्यानं 8 गुण घेऊनही पाचव्या स्थानावरच आहेत.

हेही वाचा :

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य