आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार : मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण प्रश्नावरून(reservation system) मोठे विधान केले आहे. आता आरक्षण प्रश्नावरुन कोणालाही विनंती करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठ्यांना सहा जूनपर्यंत आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार(reservation system) असून महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांच्या एकीची भीती सत्ताधाऱ्यांना स्पष्ट दिसत आहे. इतर राज्यात एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका घेतल्या गेल्या. महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मोदी सभा घेत आहेत याच्यातच आमचा विजय असल्याचे देखील मनोज जारंगे पाटलांनी सांगितले.

मराठा आंदोलकांवर खोट्या केसेस होत आहे, हे थांबवा असे सांगत जरांगे यांनी मराठ्यांना सग्या सोयऱ्यातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांना दोनदा केली. मी पण क्षत्रिय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

“आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा जरांगेंनी दिला.

शाब्दिक विधानावरून आमने-सामने आलेले महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं.बीडच्या नारायणगड संस्थांच्या फिरत्या नारळी सप्ताहाला सिरसमार्ग येथे दोघांनी हजेरी लावली होती.

व्यासपीठावर पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील येताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला अन् पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना सूचना करत शांत बसण्याचे आवाहन केले. अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली होती.

हेही वाचा :

मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही…

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता…

कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा : अजित पवार