टाटा आणि अंबानी यांना मागे टाकत सर्वात पुढे SBI

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(sbi) शेअर्सनी गेल्या पाच दिवसांत जबरदस्त कामगिरी बजावली. त्यामुळे मार्केट कॅपआधारे मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्या कंपन्यांना एसबीआयने मागे टाकले. देशातील 10 कंपन्यांमध्ये एसबीआयने आघाडी घेतली. तर यादीत ICICI Bank ने दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांमधील 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.30 लाख कोटी रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली.

चार कंपन्यांना कमाईत फटका बसला. त्यांच्या मार्केट(sbi) कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. आकड्यांनुसार, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज या आठवड्यात घसरणीत पहिल्या क्रमांकवर होती. तर टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी TCS ला पण नुकसान सहन करावे लागले. देशातील टॉप 10 मधील 4 कंपन्यांचे मार्केट कॅप 50 हजार कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली.

या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ

-गेल्या आठवड्यात देशातील टॉप 10 कंपन्यांमधील 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 1,30,734.57 कोटी रुपयांनी वाढले.

-सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेचे मूल्य या काळात 45,158.54 कोटी रुपयांनी वाढले. ते 7,15,218.40 कोटी रुपये झाले.

-देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 28,726.33 कोटींनी वाढले. ते आता 7,77,750.22 कोटी रुपये झाले.

-देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यापैकी एक भारती एअरटलेचा महसूल 20,747.99 कोटींनी वाढला. भांडवल आता 7,51,406.35 कोटींच्या घरात पोहचले.

-देशातील FMCG कंपन्यांपैकी एक ITC चे बाजारातील भांडवल 18,914.35 कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे भांडवल आता 5,49,265.32 कोटी झाले आहे.

-भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) बाजारातील भांडवल 9,487.5 कोटी रुपयांनी वाढले. आता मार्केट कॅप 6,24,941.40 कोटी रुपये झाले आहे.

-देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys च्या महसूलात 7,699.86 कोटींची वाढ झाली. कंपनीचे मार्केट कॅप 5,93,636.31 कोटी रुपयांवर पोहचले.

गेला आठवडा शेअर बाजारासाठी खास राहिला. सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या बाजारातील भांडवलात 1.30 लाख कोटी रुपयांची उसळी दिसली. या कालावधीत देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआयला सर्वात मोठा फायदा झाला. त्यामुळे एसबीआयच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. आठवडाभरातच शेअरहोल्डर्सनी 45,000 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलायन्सच्या शेअरधारकांना नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा :

मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही…

कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा : अजित पवार

आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार : मनोज जरांगे