मनोज जरांगे पाटील हे गेल्या ६ महिन्यांपासून चुकीच्या मागण्या करून समाजात(define otherwise) जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गंभीर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर आत्मदहन करेन, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
या पत्रामुळे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय(define otherwise) आणि पोलीस विभागासह यंत्रणा हादरली आहे. धनराज गुट्टे व्यक्तीने मेलद्वारे हे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. या पत्राची आयुक्तांनी दखल घेतली असून या पत्राची एक प्रत मुंबई सचिव कार्यालयाला पाठवली आहे.
त्यामुळे येणाऱ्या जरांगे यांच्याविरुद्ध काळात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांना आज रुग्णालयात डिचार्ज मिळाला असून ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. येणाऱ्या १३ तारखेला मोठा धमाका होणार, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
रुग्णालयातून डिचार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले “आता मी थेट अंतरवाली सराटीला जाऊन देवाचे दर्शन घेणार आहे. सर्वजण म्हणत आहे की हे मराठ्यांचं राज्य आहे. तर मग मराठा समाजावर अन्याय का करताय? मी धनगर बांधवांना आणि यांच्या नेत्याला विरोधक मानत नाही. पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभराजे देसाई म्हणाले आहेत 13 जुलै पर्यंत थांबा”, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
डॉ. तारख यांच्या तोंडाला सोमवारी मराठा समाजाने काळं फासलं होतं. त्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला त्या घटनेबद्दल वाईट वाटले. आंदोलनाला गाल बोट लावण्याचे काम चांगले नाही. डॉक्टरकडून एक चूक झाली असेल ते आम्ही सोडून दिले आहे. शेवटी समाजाचे आंदोलन आहे”, असं जरांगे यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
शाळेच्या वर्गातच चक्कर येऊन बेंचवरून पडून सहावीतील मुलीचा मृत्यू
कोल्हापूर : पाकिटातील नाव बदललं अन् सभापतिपद हुकलं; वडिलांची कसर काढली मुलाने भरून