राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात (rain)पुढील २४ तासात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यापासून देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावलीय.(rain) आज पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे
हेही वाचा :
शेअर बाजाराला मतदानानिमित्त सुट्टी
गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार
हार्दिकला हेच हवं होतं की…; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?