शिवसेना तुमच्यासोबत होती म्हणून तुम्ही दिल्लीच्या(new delhi) तख्तापर्यंत पोहचलात, पण आता ते तुम्हाला शक्य नाही.
‘मी आणि माझी खुर्ची’ ही जी तुमची एकाधिकारशाही आहे ती आम्हाला आमच्या देशात मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.(new delhi)
महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आयोजित जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. सोलापूर मतदारसंघात भाजपने बाहेरचा उमेदवार लादला आहे. बाहेरून पार्सल आणले आहे असे लोक बोलताहेत. भाजपवाले उद्योग महाराष्ट्राबाहेर नेताहेत आणि कांद्यावर अजून निर्यातबंदी आहे. आता ही बाहेरून आणलेली पार्सल आहेत त्यांची निर्यात करून टाका आणि अस्सल सोलापूरकरालाच निवडून देणार असे भाजपला बजावून सांगा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
ज्या संविधानावर हात ठेवून पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली त्या संविधानाची मोडतोड करण्यासाठी हात घालूनच दाखवा, संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. आरक्षण पाहिजे म्हणून अनेक समाज गेली अनेक वर्षे रस्त्यावर उतरलेत. मोदी सरकार आरक्षण काढेल हीच भीती लोकांच्या मनात आहे असे सांगतानाच, महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली याबद्दल मोदींना आकस आहे, बाबासाहेबांना लोक देव मानतात, पण मला मानत नाही, अशी खंत त्यांच्या मनात आहे, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.
कमळात नुसता मळ उरलाय
आज सोलापुरात पंतप्रधान मोदींचीही सभा झाली. त्यावेळी मोदींनी पुन्हा नकली शिवसेना असे तारे तोडले. याचा जोरदार समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. कालपर्यंत तुम्ही आमचे प्रेम अनुभवले आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचे कमळ कसे कोमजते ते बघा. तुमच्या कमळामध्ये नुसते मळ राहिले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
हेही वाचा :
दारू पिऊन लिव्हर डॅमेज झाल्यास टेन्शन घेऊ नका, डॉ सरीनने घरगुती उपाय
भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला