मेलिंडाने गेट्स फाऊंडेशन सोडले!

मायक्रॉसॉफ्ट (microsoft)कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांची घटस्फोटीत पत्नी मेलिंडा गेट्स यांनी ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या सह-अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या कंपनीतील 7 जून हा त्यांचा अखेरचा दिवस असणार आहे. सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट करून याची माहिती दिली. मेलिंडा 2000 पासून या फाऊंडेशनमध्ये कार्यरत होत्या. या फाऊंडेशनने गेल्या 25 वर्षांत जवळपास 78 अब्ज डॉलर दान केले आहेत.

मेलिंडा गेट्स यांना आपल्या चॅरिटेबल कामांसाठी 12.5 अब्ज डॉलर रुपये मिळणार आहेत. मेलिंडा या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर या संस्थेचे नाव बदलून गेट्स फाऊंडेशन होईल. तसेच बिल गेट्स हे केवळ एकटेच याचे अध्यक्ष राहतील. फाऊंडेशनचे अध्यक्ष मार्क सुजमॅनने म्हटले की, मेलिंडा गेट्स यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. (microsoft)

आता त्या अमेरिका आणि जगभरातील महिलांचे आयुष्य सुधारण्यासाठी काम करणार आहेत. मेलिंडा यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि बिल यांनी एकत्रित येत एक खास संघटना बनवली. जी आता जगभरात असमानतेविरोधात काम करत आहे. हे फाउंडेशन सीईओ मार्क सुजमॅन यांच्या नेतृत्त्वात मजबूत हातात आहे, असे म्हटले आहे.

 मेलिंडा आणि बिल गेट्स यांनी 2021 मध्ये घटस्पह्ट घेतला. तेव्हापासून मेलिंडा या फाऊंडेशनपासून दूर होतील, असे बोलले जात होते. परंतु मेलिंडा आणि बिल गेट्स यांनी 2023 पर्यंत एकत्रित काम करण्याचे ठरवले होते. याआधी प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी 15 वर्षांनंतर जून 2021 मध्ये फाऊंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा दिला होता. हे फाऊंडेशन विकासशील देशात आरोग्य, शिक्षण, गरिबी निर्मूलनासाठी काम करत आहे. मेलिंडा गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर बिल गेट्स यांनीही सोशल मीडियावर मेलिंडा गेट्स यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत मेलिंडा यांना खास धन्यवाद दिले.

हेही वाचा :

इचलकरंजीतील राकेश कांबळे खूनप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल!

इचलकरंजीत आवाडे समर्थक सुरज राठी याच्यावर खुनी हल्ला!

लोकसभेत एकी, पण विधानसभेचं काय? कोल्हापुरातील सहा जागांसाठी ‘असं’ असणार गणित..