आज लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने(guarantee) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचे संकल्प पत्र या नावाने भारतीय जनता पक्षाने आपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
पंतप्रधान मोदी(guarantee) वारंवार सांगत आहेत की त्यांच्या मते देशात फक्त चार ‘जाती’ आहेत – तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणुकीतील आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.
2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?
-रोजगार आणि उद्योजकतेभर देणार भर
-मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे
-आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार,
-70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार
-गरीबांसाठी चार कोटी घरे बांधणार
-पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरापर्यंत पोहोचवणार
-वीजबिल शून्य करण्यासाठी काम करणार, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार
-गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार
-कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार
-महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर
-मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे
-पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
-देशात आणखी तीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर बांधले जातील
-पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
-आयटी, शिक्षण, आरोग्य, किरकोळ आणि पर्यटन क्षेत्रातील बचत गटांना प्रशिक्षण
हेही वाचा :
६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
शुटिंग करताना वाद गेला टोकाला; रागातून YouTuber जोडप्यानं ७ व्या मजल्यावरून घेतली उडी
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’