राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी(feed the hungry) प्रचार सभांचा धडाका सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. मात्र 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला(feed the hungry) सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
“महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून ७ महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की त्यांचं की सांगता येत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
त्याचबरोबर “मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे,” अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
हेही वाचा :
LPG ग्राहकांसाठी अच्छे दिन; 12 सिलेंडरवर 300 रुपयांची मिळणार सबसिडी
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’
शुटिंग करताना वाद गेला टोकाला; रागातून YouTuber जोडप्यानं ७ व्या मजल्यावरून घेतली उडी