भाजप म्हणतं की, ‘अबकी बार 400 पार’ का तर म्हणे आमच्याकडे मोदींचा(face) चेहरा आहे, महाविकास आघाडीकडे काय आहे? मोदी हा चेहरा नाही, तर ती भुताटकी आहे. ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे(face) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. या वेळी राऊत म्हणाले, “शोले चित्रपटातील डायलॉग आठवतो का, ‘सो जा बच्चे नही तो, गब्बर आ जायेगा’, तसं या मोदींचं झालं आहे.
लोकांना त्यांचा चेहरा पाहून भीती वाटू लागली आहे की, कधी ते टीव्हीवर येतील आणि काय घोषणा करतील? या दहशतीखाली लोक आहेत. त्यामुळे मोदींचा चेहरा आता डरावना झाला आहे, ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. या देशात लोकशाही आहे, येथील जनता ते ठरवणार, मोदी नाही” असंही राऊत म्हणाले.
भाजपने अबकी बार चार सौ पारचा नारा दिला आहे, लोकशाही तुमच्या बापाची आहे का? हे तुम्ही कोण ठरवणारे? आज सांगतो भाजप दोनशेच्यावर जात नाही आणि देशात इंडिया आघाडी तीनशे पार पोहाेचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नाही, कारण इथे चंद्रकांत खैरेंची हवा आहे. म्हणून त्यांचा उमेदवार ठरत नाहीये, असा टोलाही राऊतांनी लगावला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा खासदार नाही, हे मनाला पटत नाही. पाच वर्षांपूर्वी खैरेंचीच हवा होती, पण आपल्याला दगाफटका झाला. खैरे संभाजीनगरातच राहिले, पण ते मनाने पाच वर्षे दिल्लीतच होते. आता खैरे तुम्हाला चिंता नाही, तुमच्यासोबत अंबादास दानवे आहेत, त्यांनी तुमच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे, असा विश्वासही राऊतांनी या वेळी खैरेंना दिला.
हेही वाचा :
‘तुझी आईच माझी सासू बनणार’; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!
पुन्हा ऑपरेशन लोटस? भाजपने आमदारांना दिली ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या रस्त्यांवरही CSK चीच हवा! खेळाडूंची झलक टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Video Viral