खासदार दाजीबा देसाई आणि देशातील निच्चांकी मताधिक्य

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : इसवी सन 1980 पर्यंत कोल्हापुरात(country) शेतकरी कामगार पक्षाचा मोठा दबदबा होता. नंतर तो हळूहळू कमी होऊ लागला. शेकापची आक्रमकता कमी झाली. त्याच दरम्यान शिवसेनेचा प्रवेश झाला आणि बघता बघता शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव संपवून शिवसेनेने कोल्हापूर काबीज केले. दिलीप देसाई हे शिवसेनेचे पहिले आमदार बनले. त्यानंतर सुरेश साळोखे यांनी शेकापचे प्रा विष्णुपंत इंगवले यांचा पराभव केला.

शेतकरी कामगार पक्ष आता कोल्हापुरात(country) आठवणी पुरता राहिलेला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसला पर्याय असलेला शेतकरी कामगार पक्ष, स्वतःचे निवडणूक चिन्ह ही अबाधित ठेवू शकलेला नाही.

तो 50 वर्षांपूर्वीचा काळ. काँग्रेसला पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे तेव्हा पाहिले जायचे. महाराष्ट्र व कर्नाटक दरम्यानच्या सीमा लढ्याची राजधानी म्हणून कोल्हापूर ओळखले जायचे. ही ओळख शेतकरी कामगार पक्षामुळे मिळाली होती. कोल्हापूर हा शेकाप चा बालेकिल्ला होता. तेव्हा डोक्यावर पांढरी सफेद टोपी घालून फिरण्याचे धाडस कोल्हापुरात कुणी करत नव्हते. डोक्यावर लाल टोपी घालून फिरण्याचा तो काळ होता. एखादा माणूस कोल्हापुरात आला तर डोक्यावरची पांढरी टोपी तो काढून घडी घालून खिशात ठेवायचा. मात्र कोल्हापुरात डोक्यावर स्टार्च केलेली क** इस्त्रीची पांढरी सफेद टोपी डोक्यावर घालणाऱ्या दोनच व्यक्ती होत्या आणि त्या म्हणजे श्रीपतराव बोंद्रे आणि शंकरराव माने.

श्रीपतराव बोंद्रे दादा हे शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत राहायचे तर शंकराव माने यांचे निवासस्थान रंकाळा रोडवर साकोली कॉर्नर नजीक होते. शिवाजी पेठ हा शेतकरी कामगार पक्षाचा परिसर. शेकापसा कार्यकर्ता डोक्यावर लाल टोपी घातल्याशिवाय बाहेर पडायचा नाही. त्या काळात शिवाजी पेठेत आणि परिसरात गांधी टोपी अर्थात सफेद टोपी घालून फिरणारे बोंद्रे तसेच माने यांना शेकापचे कार्यकर्ते दचकून असायचे. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ अशा तेव्हांच्या पेठांमध्ये कोणाचेही निधन झाले तर मृतदेहाच्या डोक्यावर लाल टोपी घातली जायची.

शंकरराव माने हे काँग्रेसचे खासदार होते. तेव्हा नीलम संजीव रेड्डी विरुद्ध व्ही व्ही गिरी या दोघांमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती आणि इंदिराजी गांधी यांना व्ही व्ही गिरी हे राष्ट्रपती म्हणून हवे होते. या निवडणुकीत शंकराव माने यांनी गिरी यांना मत दिले होते. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पद देण्यात आले होते.

आणीबाणी उठल्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शंकरराव माने हे होते तर विरोधी पक्षाच्या वतीने अर्थात जनता पक्षाच्या वतीने मूळ शेकापचे दाजीबा देसाई हे निवडणुकीच्या आखाड्यात होते. आणीबाणीमुळे काँग्रेसच्या विरोधात जनमत तयार झाले होते. कोल्हापुरात केव्हा दाजीबा देसाई यांच्या प्रचारासाठी गांधी मैदानावर पु.ल. देशपांडे यांचे प्रचार सभा झाली होती. गांधी मैदानाला वरूणतीर्थ मैदानही म्हटले जायचे. सभा ऐकण्यासाठी मैदान गर्दीने तुडुंब भरून ओसंडून वाहत होते. हे वरूणतीर्थ नव्हे, तरुणतीर्थ आहे असे वर्णन पु ल देशपांडे यांनी तेव्हा सभेच्या सुरुवातीलाच केले होते.

या निवडणुकीच्या निमित्ताने तेव्हा कोल्हापुरात तणावपूर्ण(country) वातावरण होते. अतिशय चुरशीने मतदान झाले. आणि या अटीतटीच्या निवडणुकीत शेकापचे दाजीबा देसाई हे केवळ 165 मते अधिक मिळून निवडणूक जिंकले होते. शंकरराव माने यांचा पराभव झाला होता. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. फेर मतमोजणी झाल्यानंतरही थोड्याशा मताने दाजीबा देसाई हेच विजयी झाले होते.

दाजीबा देसाई हे मूळचे बेळगावचे. पण सीमा लढ्याच्या निमित्ताने ते कोल्हापुरातच असायचे. त्यांना खासदारकीची पाच वर्षे मिळाली नाहीत. संपूर्ण देशामध्ये सर्वात कमी मताधिक्क्याने निवडून आलेले म्हणून दाजीबा देसाई यांना ओळखले जात होते.

इसवी सन 1980 पर्यंत कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाचा मोठा दबदबा होता. नंतर तो हळूहळू कमी होऊ लागला. शेकापची आक्रमकता कमी झाली. त्याच दरम्यान शिवसेनेचा प्रवेश झाला आणि बघता बघता शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव संपवून शिवसेनेने कोल्हापूर काबीज केले. दिलीप देसाई हे शिवसेनेचे पहिले आमदार बनले. त्यानंतर सुरेश साळोखे यांनी शेकापचे प्रा विष्णुपंत इंगवले यांचा पराभव केला.

शेतकरी कामगार पक्ष आता कोल्हापुरात आठवणी पुरता राहिलेला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसला पर्याय असलेला शेतकरी कामगार पक्ष, स्वतःचे निवडणूक चिन्ह ही अबाधित ठेवू शकलेला नाही.

हेही वाचा :

अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान

2 पाय-या चढल्यावरही लागते भयंकर धाप? होता घामाने ओलेचिंब?

भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण