सारा महाराष्ट्र गहिवरल्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेतला!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोमवारी अचानक काही वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र(political updates) गहिवरला. वृत्त निवेदकांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांचे डोळे पाणावले गेले. गुन्हेगारी विश्वाच्या इतिहासात हत्येचे इतके भीषण कृत्य पहिल्यांदाच दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी घडले.

अमानुष, क्रूर, निर्दयी, सैतानी हैवानी अशी विशेषणे सुद्धा सौम्य वाटावी असे हे हत्या प्रकरण आहे. अशा या दुर्मिळातील दुर्मिळ घटनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची सर्व थरातून मागणी होत असताना सरपंच हत्या प्रकरणात त्यांचा संबंध काय? असा युक्तिवाद करणाऱ्या भारतीय जनता पक्षामधील काही नेत्यांची तोंड पाटील की आता मुंडे यांच्या राजीनामा नंतर बंद होईल. अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे यांचा जेवढा बचाव केला त्यापेक्षा दहापट बचाव भाजपमधील काही जणांनी केला होता.

वाल्मीक कराड यांच्यासह इतर आठ नराधवांच्या विरुद्ध तपासा यंत्रणेने न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोप पत्र काही दिवसांपूर्वी दाखल केले. त्यानंतर सरपंच देशमुख यांची हत्या करताना ते नराधम हसत होते. रक्तबंबाळ झालेल्या सरपंच देशमुख यांच्याबरोबर सेल्फी काढून भीषण घटनेचा आनंद घेत असल्याचे काही फोटो काही वृत्तवाहिन्यांना मिळाले. फराकोटीच्या यातना सहन करून मृत्युमुखी पडलेल्या संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी ही शोक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्त निवेदिकेला तर अश्रू अनावर झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले. समाज मन सुन्न झाले. धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळल्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेण्याशिवाय महायुतीकडे पर्यायच उरला नाही. तब्बल दोन महिन्यानंतर त्यांना नैतिकतेचा साक्षात्कार झाला आणि मग धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.

वाल्मीक कराड हा माजलेला गुंड मंत्री धनंजय मुंडे(political updates) यांची सावली बनलेला होता. इतकेच काय तर तो बीड जिल्ह्याचा अघोषित पालकमंत्री होता. जिल्ह्याची संपूर्ण शासकीय यंत्रणा तो आपल्या बोटावर नाचवत होता. वाल्मीक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पान सुद्धा हलत नाही अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी वाल्मीक कराडचा उल्लेख केला होता. “आपल्या आडवे कोणी आले, आणि आपण त्याची दखल घेतली नाही तर खंडणीचा उद्योग करता येणार नाही. म्हणून जो कोणी आडवा येईल त्याला संपवून टाकले पाहिजे”असे वाल्मीक कराड यानेआपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. असा उल्लेख दोषारोप पत्रात करण्यात आलेला आहे.

वाल्मीक कराड व त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध दीड हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी सर्व आरोपींच्या निर्दोष सुटकेसाठीच इतके प्रचंड दोषारोप पत्र दाखल केले आहे असा अकारण आरोप केलेला होता. आता दोषारोप पत्रातील काही तपशील बाहेर येऊ लागल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल कोणाच्याही मनात संशय येणार नाही. संजय राऊत यांच्या मनातील संशय सुद्धा दूर झालेला असेल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही सर्वसाधारण असल्याचे म्हटले होते. दुर्मिळातील दुर्मिळ घटना नव्हे असे अप्रत्यक्षपणे त्यांना सुचवावयाचे होते. आता त्यांनाही घटनेतील पराकोटीची भीषणता समजली असेल.

दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर एक दोन दिवसातच दोषारोप पत्रासोबत जोडलेले दहा ते बारा फोटो माध्यमांच्या हाती लागतात यामागे राजकीय(political updates) सूत्र असल्याचे म्हणता येईल. कुणीतरी आदेश दिल्याशिवाय दोषारोप पत्रातील फोटो माध्यमांच्या हाती लागणार नाहीत. याचा अर्थ असाही होतो की, वाल्मीक कराड प्रकरण हे सरकारला त्रासदायक ठरत आहे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व थरातून दबाव येतो आहे, मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठीचे वातावरण तयार करण्यासाठी त्या फोटोंचा वापर करण्यात आलेला आहे. आधी शोक संतप्त वातावरण तयार केले आणि मग धनंजय मुंडे यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. असे म्हणता येईल.

वाल्मीक कराड याचे बीड जिल्ह्यातील काळे साम्राज्य भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके, तसेच आमदार संदीप क्षीरसागर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया, मसाजोग या गावचे ग्रामस्थ, त्यांनी केलेले शोले स्टाईल आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन यांना धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्याचे श्रेय द्यावे लागेल. या सर्वांनी गेल्या दोन महिन्यांपासून वाल्मीक कराड प्रकरण उचलून धरले होते.

संतोष देशमुख(political updates) हत्या आणि पवनचक्की कंपनीकडे मागितलेली खंडणी या दोन्ही गुन्ह्यात वाल्मीक कराड याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने अटक केल्यानंतर कराड याच्या समर्थकांच्याकडून परळी आणि केज येथे आंदोलन करण्यात आले होते. याच दरम्यान वाल्मीक कराड हा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा “मसीहा”आहे, तो परमेश्वर आहे, असे ध्वनीत करणारे काही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले जात होते. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 15 व्हिडिओ आणि तितकेच फोटो जप्त केले आहेत.

आता हे जिवंत पुरावे वाल्मीक कराड आणि त्याच्या नराधम साथीदारांच्या विरुद्ध न्यायालयात मांडले जाणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना कशी आहे याबद्दलचे सज्जड पुरावे तपास यंत्रणेने संकलित केले आहेत. हत्या करताना त्याचा आनंद घेणे, मृताच्या तोंडावर लघुशंका करणे, रक्तबंबाळ सरपंच देशमुख यांच्याबरोबर ते मृत्यूच्या गुहेत जात असताना त्याची सेल्फी घेणे, आम्ही कशा पद्धतीने हत्या करत आहोत याचे चित्रण व्हिडिओ कॉलिंग द्वारे वाल्मिक कराडला दाखवणे हे सर्व प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ म्हटले पाहिजेत. सरपंच देशमुख यांची हत्या केल्यानंतर आपणाला कोणीही अटक करणार नाही आपल्या पाठीमागे मंत्री आहेत अशा मानसिकतेतून
नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे.

मानवत हत्याकांड, पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड, राठी हत्याकांड, अंजनाबाई गावित, सीमा गावित, रेणुका शिंदे यांनी केलेले बालके हत्याकांड खैरलांजी हत्याकांड, ही सर्व प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ समजली गेली होती आणि आता त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची भर पडलेली आहे.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंनी मागितली देशमुख कुटुंबाची माफी

लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल

31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ अक्षयने स्पर्श करताच जोडले हात व्हिडीओ व्हायरल