नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले

नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित केला असून ते सलग तिसऱ्यांदा(political consultant) पंतप्रधान होणार, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. १९) गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार, असं म्हटलं.

सध्या लोकसभा निवडणुकीची(political consultant)धामधूम सुरु असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. दुसरीकडे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अमित शहा (Amit Shah) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शहा म्हणाले, ‘मी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असून गांधीनगरचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आहे. मोदीजींनी देश सुरक्षित केला असून २०२४ पर्यंत भारताचा विकास होईल”.

लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला बहुमत मिळेल. त्याचबरोबर भाजप देशील ३५० जागांचा आकडा पार करेल. नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केलाय. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असंही देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमित शहा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक देखील गांधीनगर येथून लढवली होती.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले

या निवडणुकीत त्यांनी ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यंदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने मोठी रणनिती आखली आहे.

काँग्रेसने गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून पक्ष सचिव सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पटेल यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुजरातमधील सर्व २६ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

हेही वाचा :

उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!

मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका; मत विभाजनानं कोणाचा होणार ‘गेम’?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? ‘कचा-कचा’ वक्तव्य भोवणार