पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये नवदीप सिंहचे सुवर्णसिंकण! नीरज चोप्राला जमलं नाही, ते नवदीपने केलं;

पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये (paraolympic)भारताच्या नवदीप सिंहने इतिहास रचत भालाफेक (F41) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. याचसोबत, भारताच्या पदकांची संख्या आता २९ वर पोहोचली आहे, ज्यात ७ सुवर्ण, ८ रौप्य, आणि १४ कास्य पदकांचा समावेश आहे.

नवदीपने अंतिम फेरीत ४७.३२ मीटर अंतरावर भाला फेकत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. इराणच्या सादेघ सयाह बेतला आधी सुवर्णपदक घोषित करण्यात आले होते, परंतु त्याच्या अपात्रतेनंतर नवदीपला रौप्य पदकाच्या जागी सुवर्णपदक मिळाले.

याच दिवशी महिलांच्या २०० मीटर (T12) धावण्याच्या स्पर्धेत सिमरन शर्माने भारतासाठी कास्य पदकाची कमाई केली, यामुळे पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची घोडदौड अजून बळकट झाली आहे.

हेही वाचा:

गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!

कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब

विशाल पाटील आणि जयंतराव खुर्चीला खूर्ची लावून गप्पांमध्ये गुंग; सांगलीत राजकीय चर्चा रंगली!