नीरजने सोने जिंकले, पण कामगिरी सामान्य

नुकत्याच दोहा डायमंड(diamond) लीगमध्ये नीरज चोप्राने 88.36 मीटर भालाफेक करत रौप्य जिंकले होते, मात्र अॅथलेटिक्सच्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्ण जिंकले पण त्याची कामगिरी सामान्य ठरली. त्याने 82.27 मीटर भालाफेक करत सोने जिंकले, तर त्याचा प्रतिस्पर्धी डीपी मनूने 82.06 मीटर भालाफेक करत रौप्य पटकावले. उत्तम पाटीलने 78.39 मीटर ही आपली सर्वोत्तम कामगिरी करताना कास्य पदक जिंकले.

तीन वर्षांनंतर मायदेशात खेळत असलेल्या ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राच्या भालाफेकीकडे सार्यांचे लक्ष लागले होते. दोहा येथे 88.36 मीटर फेक करूनही त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भुवनेश्वरमध्ये ही दोहा येथील कामगिरीला साजेशी कामगिरी करेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण त्याने तब्बल सहा मीटर कमी अंतर गाठत आपल्या सामान्य फेकीचे प्रदर्शन घडवले. नीरजने 82 मीटरच्या आसपास फेक करूनही बाजी मारली. त्याची सर्वोत्तम फेक 89.94 मीटर आहे आणि तो गेली तीन वर्षे 90 मीटरच्या अंतराला पार करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतोय.(diamond)

त्याचे हे लक्ष्य फेडरेशन कपमध्ये गाठले जावे, अशीही साऱयाची इच्छा होती, पण त्याने आज साऱयांनाच निराश केली आणि स्वताही निराश झाला. या स्पर्धेतूनही हिंदुस्थानी भालाफेकपटूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी होती. नीरज आणि किशोर जेना हे आधीच पात्र ठरले आहेत. त्यामुळे दोघांना फेडरेशन कपमध्ये थेट प्रवेश देण्यात आला होता. चोप्राने सुवर्ण जिंकले, पण जेनाला अचूक भालाफेकच करता आली नाही. मात्र अन्य भालाफेकपटूंना ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85.50 मीटर हे अंतर गाठणे आवश्यक होते, पण कुणीही हे अंतर गाठू शकला नाही. जे पात्र ठरलेत तेसुद्धा हे किमान अंतर गाठू शकले नाही.
भालाफेकीचा अंतिम निकाल
– नीरज चोप्रा 82.27 मी.
– मनु डीपी 82.06 मी.
– उत्तम पाटील 78.39 मी.
– बिबीन अॅण्टोनी 77.37 मी.
– किशोर जेना 75.49 मी.
– प्रमोद 74.45 मी.
– मंजिंदर सिंग 72.58 मी.
– विकास यादव 71.66 मी.
– विवेक कुमार 71.40 मी.
– कुंवर सिंग राणा 71.12 मी.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले

हातकणंगले लोकसभेला जमलेली गट्टी विधानसभेला ….

हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये नोकरीची मोठी संधी