नितीन गडकरी अंबाबाई चरणी; नेमकं काय घातलं साकडं?

कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला संपयला अवघे तीन दिवस(charani exclusive) बाकी आहेत. यातच देशाचे रस्ते आणि अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

शुक्रवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा संपन्न झाल्यानंतर(charani exclusive) आज सकाळी त्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक त्यांच्यासोबत होते.

दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेण्याचा योग आला. आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न व्हावा, अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली. गरीब मजदूर शेतकरी सुखी व्हावे, जगात आपला देश विश्वगुरु आहे, तसा आर्थिक दृष्ट्‍या ही तिसरी महासत्ता व्हावा. बेरोजगारीपासून देशाला मुक्ती मिळावी ही देवीच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेसनेजी धोरणे राबवली. ती अत्यंत चुकीची होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही जनतेला त्याचा त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काँग्रेसची 60 वर्षातील ध्येयधोरणे आणि आम्ही गेल्या 10 वर्षात राबविलेल्या ध्येयधोरणांची तुलना देशवासीयांनी करावी. देशाचे भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आणि मजबूत राहील याचा विचार करण्याची गरज आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

कोल्हापुरातील प्रचाराची सांगता रविवारी होणार आहे. त्यामुळे तीन दिवसांत प्रचाराचा धडाका लावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी संजय मंडलिक यांच्यासाठी महासैनिक दरबार येथे व्यापारी, उद्योजक यांच्यासमवेत सभा घेणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या प्रचाराचा वाढणार वेग !

रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश

इचलकरंजी येथे रात्री वसुलीसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांसह तिघांना मारहाण