पत्नी भाजपात तरी राणांचा ‘स्वाभिमान’ जिवंत, आता घरावर कोणता झेंडा… ; बच्चू ‘कडूंचा’ प्रहार!

प्रहार क्रांती संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्यामहायुतीचे(bitter) घटक पक्ष आहे. असे असले तरी त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडूंनी आपल्या प्रहार संघटनेकडून उमेदवार उभा केला आहे. तसेच अकोला मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना कडू पाठिंबा दिला आहे. आता तर त्यांनी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणांवर निशाणा साधला आहे.

मी माझ्या जीवनात माझा पक्ष सोडून कुठेही आणि कोणत्याही पक्षात(bitter) जाणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिल्यानंतर यावर बच्चू कडू म्हणाले, “रवी राणा यांनी हा स्वाभिमान टिकवून ठेवला, त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली पाहिजे. त्यांच्या पत्नी नवनीत राणा भाजपामध्ये गेल्यानंतरही त्यांच्या घरावर त्यांनी स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला, मग आता बीजेपीचा झेंडा कुठे लावाल? हा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे,” अशा शब्दात कडूंनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.

“राणा यांनी एक बाजू मोकळी ठेवली आहे, जर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा राणा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातील.असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये आहे, पण मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो, असा पर्याय त्यांनी ठेवला आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

“कायम सत्तेसोबत आम्ही राहिलोच पाहिजे, अशी व्यवस्था त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस सोबत जाण्याचा त्यांनी पर्याय तयार ठेवला आहे. मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे, एकाच घरात दोन पक्षाचे लोक, नवरा एका पक्षात आणि पत्नी वेगळ्या पक्षात. यावर पीएच. डी. केली पाहिजे. याचं संशोधन झालं पाहिजे,” यावर विचार चिंतन-मंथन मतदारांनी केलं पाहिजे,” असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा :

कोल्हापुरात पती, दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

खंडणी दे अन्यथा तुझ्या पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल करतो.. कोल्हापुरात माथेफिरूला अटक

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक