कोल्हापुरात पती, दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी : पती व दिराच्या त्रासाला(married woman) कंटाळून चिंचवाड ता करवीर येथील पुनम चंद्रकांत पाटील वय 37 या विवाहितेने घरी तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार सकाळी उघडकीस आली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पती चंद्रकांत राजगोंडा पाटील वय 53, दीर शशिकांत राजगोंडा पाटील वय 54, दोघेही रा. कळे गल्ली चिंचवाड यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबतची फिर्याद मृत महिलेच्या मुलगी मेघा चंद्रकांत पाटील वय 19 हीने दिली.

चंद्रकांत व पूनम त्यांचे लग्न 2004 ला झाले होते. चंद्रकांत व त्याचा भाऊ शशिकांत या दोघांनाही(married woman) दारूचे व्यसन आहे. चंद्रकांत हा पत्नीस जेवण चांगले केले नाहीस, दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी करत वारंवार तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. दीर शशिकांत हा ही घरगुती कारणावरून भावजयला विनाकारण शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होता.

तू रेल्वे रुळाखाली जाऊन मर असे पती चंद्रकांत तिला दरडावून सांगत भांडण करत असे या त्रासाला कंटाळून जगणं असह्य झाल्यानें पूनमने घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती चंद्रकांत व दीर शशिकांत यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरे करत आहेत.

हेही वाचा :

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

खंडणी दे अन्यथा तुझ्या पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल करतो.. कोल्हापुरात माथेफिरूला अटक