खंडणी दे अन्यथा तुझ्या पत्नीचे अश्लिल फोटो व्हायरल करतो.. कोल्हापुरात माथेफिरूला अटक

कोल्हापूर प्रतिनिधी : पाच लाखांची खंडणी(photos) दे अन्यथा तुझ्या पत्नीची सोशल मिडीयावर बदनामी करतो. अशा प्रकारे अश्लील मेसेज पतीच्या फेसबुकवर पाठवून त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.

या माथेफिरूने संबंधीत महिलेच्या पतीच्या फेसबुक(photos) खात्यावर अश्लील मेसेज करून पाच लाखांची खंडणी मागितली. तसेच पाठलाग करून महिलेचा विनयभंगही केला होता. शुभम सदाशिव खेतल (वय २७, रा. बागल चौक) असे या संशयिताचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केले.

जानेवारी २०२३ पासून तो या महिलेस त्रास देत होता. महिलेने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने तिच्या पतीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज करून तिची बदनामी केली. तसेच पतीकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.

\पीडित महिला बाजारात खरेदीसाठी जाताना तिच्या मोपेडचा पाठलाग करून वाटेत अडवून विनयभंग केला. सोशल मीडियात बदनामी करून तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी खेतल याला अटक केली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरच्या कळंबा कारागृह सुरक्षेला भगदाड…

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग