कोल्हापूरच्या कळंबा कारागृह सुरक्षेला भगदाड…

कोल्हापूर प्रतिनिधी : कारागृहात तंबाखुच्या पुड्यातून(security) गांजाची तस्कारी. कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेला भगदाड पडले आहे. याचे कारण म्हणेज अंमली पदार्थ थेट कैद्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे दिसून येते. कारागृह प्रशासनाने केलेल्या झाडाझडतीमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

कळंबा कारागृहातील कैदी मोबाईलसह अंमली(security) पदार्थ चोरट्या मार्गाने कारागृहात उपलब्ध करीत असतात. प्रत्येक वेळी वेगवेगळी शक्क्ल लढवली आहे. यावेळी कारागृहात तंबाखूनच्या पुड्यातून गांजा पाठवला जात होता. कारागृह प्रशासनाने केलेल्या झाडाझडतीमध्ये हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात येरवडा कारागृहानंतर मजबूत आणि मोठे कारागृह म्हणून कळंबा कारागृहाला ओळखले जाते. सध्या या ठिकाणी २००० पुरुष तर १५० महिला कैदी आहेत. कारागृहाची क्षमता १६०० आहे, मात्र चारशे ते पाचशे अतिरिक्त कैदी आहेत. पुणे,मुंबईतील गॅगस्टर टोळीतील गुन्हेगारही कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कळंबा कारागृहात तबंखूच्या पुड्यांमध्ये लपवून कैद्यांना गांजा पुरवला जात असल्याचा प्रकार सोमवार (ता.८) सायंकाळी उघडकीस आला. कारागृहाची झडती घेताना सर्कल क्रमांक आठमध्ये कचरा कुंडीत सापडलेल्या तंबाखूच्या पुड्यांमधील २१४ ग्रॅम गांजा कारागृह पोलिसांनी जप्त केला. तसेच सर्कल क्रमांक पाचच्या बरॅक क्रमांक एकमागे एक मोबाइलही पोलिसांना मिळाला. याबाबत अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सहकारी कर्मचा-यांसह कारागृहाची झडती घेत होते. बरॅक क्रमांक आठमध्ये कचरा कुंडीची झडती घेताना त्यांना तंबाखूच्या १३ पुड्या आढळल्या. एकाचवेळी मोठ्या संख्येने पुड्या आढळल्यामुळे तपासणी केली असता, त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी कैद्यांकडे चौकशी केली. मात्र, पुड्या टाकल्याची कबुली कोणीच दिली नाही.

देवकर यांनी २१४ ग्रॅम गांजा असलेल्या पुड्या जप्त केल्या. तंबाखूच्या पुड्यांमधून कारागृहात पोहोचलेला गांजा कोणी आणि कोणासाठी पाठवला होता, याचा शोध घेण्याचे आव्हान कारागृह पोलिसांसह जुना राजवाडा पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. मोबाइल आणि गांजा जप्त करून कारागृह अधीक्षकांच्या सूचनेनुसार भोई यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा :

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींची सभा; उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक