डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी रविवार (sunday)१४ एप्रिल रोजी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.
मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी रविवार (sunday)१४ एप्रिल रोजी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण अप आणि धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याणदरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील.दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. यादरम्यान सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.
रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरी बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत बोरिवली –गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा
शरद पवारांनी डाव टाकलाच! ‘हा’ नेता घेणार तुतारी हाती; पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला
महाराजांची माफी मागा; कोल्हापूरकर सहन करणार नाही; मंडलिकांच्या वक्तव्याचा सतेज पाटलांकडून समाचार…