पोटात सतत गॅस आणि अपचन होत असेल तर हे 4 पदार्थ कारणीभूत असू शकतात 

पादणं हे अगदीच नॉर्मल आहे. सामान्य माणूस दिवसातून 5 ते 15 वेळा पोटातला गॅस (gas)बाहेर सोडतो.

एखाद्या दिवशी पोटात भरपूर गॅस होणं हे चांगलं आरोग्य असण्याचं लक्षण आहे (अर्थात तुम्हाला तेव्हा वाटलेली अस्वस्थता आणि लाज थोडी विसरावी लागेल.) कारण ज्या पदार्थांमुळे गॅस(gas) तयार होतो ते पदार्थ फायबरयुक्त जटील कर्बोदकांनी बनलेले असतात, तुमचं शरीर त्याचं विघटन करू शकत नाही. पण तुमच्या आतड्यातले बॅक्टेरिया त्याचं विघटन करू शकतात.

इथं आपण कोणते अन्नपदार्थ तुमच्या पोटात गॅस तयार करतात आणि कोणत्या स्थितीत डॉक्टरकडे कधी जायचा निर्णय घ्यायचा याचा विचार करू. या 8 पदार्थांच्या यादीतल्या काही पदार्थांमुळे तुम्हाला धक्काही बसू शकतो.
1) मेदयुक्त पदार्थ म्हणजे मेदयुक्त मांस
मेदयुक्त पदार्थ हे संथगतीने पचतात. त्यामुळे ते तुमच्या आतड्यात सडतात, ते तिथंच आंबतात आणि मग त्याचा वास येऊ लागतो.

मेदयुक्त मांस हे पचायला दुप्पट कठीण असतं कारण त्यात अमायनो अॅसिड मिथिओनाइन असतं, आणि ते सल्फर तयार करतं.

तुमच्या आतड्यातले जीवाणू सल्फरचं विघटन हायड्रोडन सल्फाइडमध्ये करतात आणि त्याचा वास कुजलेल्या अंड्यांसारखा येतो. त्यामुळे पोटातून बाहेर सरणाऱ्या वायूला दुर्गंध येतो.

  1. द्वीदल धान्यं
    द्वीदल धान्यं आणि डाळींमध्ये भरपूर फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ असतात. त्यांच्यामध्ये रॅफिनोजही असतं.

हा एक साखरेचा जटील प्रकार आहे. तो व्यवस्थित पचत नाही. ही साखर तुमच्या आतड्यापर्यंत जाते. तेथे जीवाणू त्याचा उर्जेसाठी वापर करतात, या प्रक्रियेत हायड्रोजन, मिथेन आणि गंधयुक्त सल्फरही तयार होतो.

  1. अंडी
    लोकसमजुतीनुसार अंड्यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र अंड्यांमध्ये सल्फरयुक्त मिथेओनाईन असतं.

त्यामुळे गंधयुक्त पादणं नको असेल तर गॅस निर्माण करणाऱ्या द्विदल धान्यं, मेदयुक्त मांसाबरोबर अंडी खाणं टाळा.

  1. कांदा
    कांदे आणि लसणांमध्ये फ्रुक्टन नावाचं कर्बोदक असतं. त्यामुळे गॅस धरणे, पोट फुगणे असे त्रास संभवतात.

हेही वाचा :

विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान Video Viral

पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात

हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं