इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! 

इक्वेडोर मध्ये हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध इन्स्टाग्राम(instagram advertising) इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल लॅन्डी पार्रागा गोयबुरो हिची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या तिच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दोन हत्यारधारी लोकांनी केली.

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोयबुरो हिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रेस्टॉरंटचे(instagram advertising) लोकेशन शेअर केले होते. यामुळे हल्लेखोरांना तिच्यापर्यंत पोहोचणे सोपे झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही पोस्ट व्हायरल झाली होती. पोस्टला 7500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. पण याच पोस्टमुळे तिला स्वतःचा जीव गमवावा लागला.

हल्ल्याचे CCTV फुटेज समोर आले असून त्यामध्ये दोन हत्यारधारी व्यक्ती हॉटेलमध्ये घुसून थेट गोयबुरो हिच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. या घटनेदरम्यान काही लोकांनी पळ काढला तर काहींनी जमीनदोस्त होऊन स्वतःचा बचाव केला. परंतु हल्लेखोरांचे लक्ष्य फक्त गोयबुरो हिच्यावरच होते. त्यांनी जरी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना यश मिळाले नाही.

हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हत्येमागे गुन्हेगारी टोळीचा हाथ असल्याची अफवा आहे. या इन्फ्लुएन्सरचे गुन्हेगारांशी तसेच एका ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. याशिवाय तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ही होते. मात्र या प्रकरणी तिच्यावर कधीही कारवाई झाली नाही. या हत्येमागे ड्रग्ज कथित माफियाच्या पत्नीचा हाथ असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

जोतिबाचे दर्शन घेऊन आलेल्या तरुणाचा कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू….

पूल नाही, तर मतदानही नाही; महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर खिद्रापुरात अर्धवट पुलामुळे तीव्र नाराजी

कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली Video